नेहा लिमये
संघर्षाची ठिणगी पेटते तेव्हा देशप्रेम, अस्मिता वगैरे भावना अतिशय तीव्र असतात. पण युद्ध जितकं लांबत जातं, तितक्या या भावना बोथट होत जातात. पुढेपुढे शिल्लक राहतो, तो फक्त राजकीय शक्तींचा सत्तासंघर्ष! युद्धानंतर उरतं, ते जीव तोडून, अगदी आतून लिहिलेलं, गायलेलं, वाजवलेलं संगीत. कधी ‘हीलर’ तर कधी ‘किलर’ संगीत!