हिवाळ्यात प्या तुळस गवती आणि आरोग्यवर्धक चहा..!

आरोग्यवर्धक चहाचे विविध प्रकार
Tea
Teaesakal
Updated on

निर्मला देशपांडे

तुळस गवती चहा काढा

साहित्य

दहा-बारा तुळशीची पाने, २ पाने चिरलेली गवती चहाची पाने, अर्धा चमचा आल्याचा कीस, चमचाभर धन्याची जाडसर पूड, छोटा दालचिनी तुकडा, चिमूटभर मिरपूड, प्राजक्ताची २ पाने, १ बेलपान, खडीसाखर.

कृती

पातेल्यात दोन कप पाणी उकळत ठेवावे. त्यात वरील सर्व साहित्य घालावे. उकळून एक कप काढा करावा. गाळून गरम गरमच प्यावा.

आरोग्यवर्धक चहा

साहित्य

प्रत्येकी १०० ग्रॅम धने व गवती चहा, प्रत्येकी ३ ग्रॅम लेंडी पिंपळी व सुंठ, प्रत्येकी ५ ग्रॅम तुळस, पुदिना, वेलची व गुलाब पाकळ्या, प्रत्येकी २ ग्रॅम जेष्ठमध, दालचिनी व अर्जुन पूड, चवीपुरती पत्री खडीसाखर किंवा गूळ.

कृती

वाळलेला गवती चहा कापून त्याची मिक्सरवर पूड करावी. धने, दालचिनी व वेलचीची पूड करावी. वाळलेली देशी गुलाबकळी अर्धवट कुटावी. तुळस, पुदिना वाळवून जाडसर पूड करावी. मग सगळे एकत्र करून डब्यात भरून ठेवावे.

चहा करण्यासाठी एक कप पाण्यात तयार पूड १ चमचा आणि चवीपुरती खडीसाखर किंवा गूळ घालून उकळून पाऊण कप करावे. गाळून गरम गरम प्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.