अमृता आर्ते
साहित्य
एक कप बासमती तांदूळ, १ कप मूग डाळ, २ मोठे चमचे तूप, प्रत्येकी १ चमचा हळद-लाल तिखट-जिरे पूड-गरम मसाला, हिंग, मीठ, साखर चवीनुसार, सुका मसाला - १ तमालपत्र, १ इंच दालचिनी तुकडा, २ सुक्या मिरच्या, ४ लवंगा, ४ हिरव्या वेलची, १ चमचा आले बारीक चिरून, १ कप भाज्यांचे तुकडे (फ्लॉवर, मटार, बटाटा, फरसबी, गाजर), अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो.
कृती
तांदूळ धुऊन अर्धा तास भिजत ठेवावेत. मुगाची डाळ चांगली भाजून, धुऊन पाण्यात भिजवून ठेवावी. एका जड तळाच्या कढईत तूप गरम करून त्यात सुका मसाला, हिंग, आले घालून परतावे व त्यात टोमॅटो घालून शिजवून घ्यावा. नंतर त्यात मसाले, मीठ, साखर, भाज्या घालून परतून घ्याव्यात. त्यात २ कप गरम पाणी, मुगाची डाळ घालून डाळ अर्धी शिजेपर्यंत शिजवून घ्यावी. नंतर त्यात तांदूळ आणि २ कप गरम पाणी घालून तांदूळ शिजेपर्यंत खिचडी शिजवून घ्यावी.