सतीश देशपांडे
श्वसनविकार, रक्तवाहिन्यांसंबंधी विकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार यांमध्ये अलीकडच्या काळात वाढ होत आहे. उष्णतेच्या लाटा उन्हाळ्याच्या दिवसांत अल्पकाळासाठीच, पण मानवी आरोग्यावर तीव्र परिणाम करू शकतात. अनेकदा आरोग्य आणीबाणीला कारणीभूत ठरतात.
परिणामी अधिक मृत्यू होऊन सामाजिक, आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम आरोग्य सेवा वितरण क्षमतेवर होतो