टोकाचे कौतुक आणि टोकाची टीका झालेली पण जगातील सर्वात महाग चित्र; कोण आहेत हे चित्रकार?

आपल्या पूर्वग्रहांची जळमटं झटकून जर लोकांनी माझी ही पेंटिंग पाहिली, तर त्यांना या पेंटिंगचा आनंद घेण्यात काही अडचण येणार नाही. हे म्हणजे रंगीबेरंगी फुलांचा मनोहारी गालिचा बघण्यासारखं..
jackson pollock
jackson pollockEsakal
Updated on

डॉ. सुहास भास्कर जोशी

चित्रकार जॅक्सन पोलॉकला कलारसिक आणि समीक्षक यांच्याकडून कायमच अगदी टोकाच्या प्रतिक्रिया अनुभवायला मिळाल्या. एकीकडं ‘विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ अमेरिकी चित्रकार’ व ‘अप्रतिम सौंदर्यपूर्ण चित्रप्रतिमांची गूढरम्य भाषा मांडणारा प्रतिभावंत’ अशी अफाट स्तुती; तर दुसरीकडं ‘केसांच्या गुंतवळातून निसटलेले केस आणि भाजलेली मॅकरोनी असलेली निरर्थक गलिच्छ कलाकृती’ व ‘एक वेड्या दारुड्याने दारूच्या नशेत कॅनव्हासवर उडवलेले रंगांचे बेछूट फटकारे’ अशी टोकाची भयंकर टीका त्याच्या चित्रांवर पोलॉकला अनुभवायला मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.