भालचंद्र औताडेवय हा केवळ एक आकडा आहे, आणि वयाची पर्वा न करता माणूस पूर्ण आयुष्य जगू शकतो ही मानसिकता आहे. आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन राखणं आणि निरोगी आणि तंदुरुस्त राहणं हे महत्त्वाचं आहे..‘साठी उलटली, आता हिमालयातील अवघड ट्रेक करू नका,’ असं सगळे सांगतात. पण मन काही ऐकत नाही. ही हिमालयाची ओढ आहेच अशी बघा! स्वस्थ बसूच देत नाही. राधा, माझी पत्नी तर सदैव तयारच असते ट्रेकसाठी. सुदैवाने दोघांची या बाबतीतली आवड व्यवस्थित जुळते. त्यामुळे सतत नवीन ठिकाणी ट्रेकला जाण्याचे बेत ठरत असतात. यावेळी नेपाळमधील १३,५०० फूट उंचीवरील ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ला जायचा बेत पक्का केला. राधा असे हटके ट्रेकच पसंत करते. मग काय, पुढच्या आठ दिवसात विमानप्रवासाची तिकीटं, हॉटेलं यांचं बुकिंग, परदेशी चलन असे सगळे सोपस्कार पूर्ण केले. ट्रेकसाठी अत्यावश्यक असलेलं कीट तर नेहमीच तयार असतं. त्यामुळे ‘बॅग भरो निकल पडो’ हे अजमावून काठमांडूला रवाना झालो.एक दिवस काठमांडूमध्ये मुक्काम केला. थोडे साइटसीइंग केले व दुसऱ्या दिवशी पोखराला जाणारी अर्ध्या तासाची फ्लाइट घेऊन हॉटेलवर पोहोचलो. इथे विविध राज्यातून आलेले तरुण सवंगडी भेटले. आमची १४ जणांची टीम झाली. दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात नयापुल गावातून ट्रेक सुरू केला. एकमेकांच्या साथीने रोज ७ ते ९ तास चालणे व्हायचे. आजूबाजूचा मोहक निसर्ग, दाट झाडी, खाली खळखळत वाहणारी नदी पाहत आपण किती चाललो हे कळतच नव्हते. .इथे प्रत्येक वळणावर अनोखे दृश्य बघायला मिळत होते. प्रत्येक दृश्यात विविधता तर इतकी होती, की तुम्ही मंत्रमुग्ध होऊन पुढे पुढे चालत राहण्याची प्रेरणा मिळत होती. ह्या ट्रेकमध्ये अन्नपूर्णा , मचपुचारे, गंगापूर्ण, गंधर्वचुली अशी महाकाय बर्फाच्छादित पर्वत शिखरे सतत सोबत असतात. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आकाश स्वच्छ असतं, त्यामुळे निळ्याशार आकाशाच्या कॅनव्हासवर हिमालयाची ही बर्फाच्छादित शिखरं इतकी समीप पाहून खूप भारी वाटलं.अन्नपूर्णा बेस कॅम्पला पोहोचण्यास पाच दिवस लागले, वाटेत मुक्काम आरामदायक टी हाउसमध्ये केला. प्रत्येक मुक्कामी एक अनोखं सृष्टी सौंदर्य लाभत असे. थंडीत बाहेर बसून सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी गरम गरम ब्लॅक कॉफी पीत बसायचा आनंद आणि तोही हिमालयाच्या कुशीत, हा अनुभव काही औरच. ही खरी श्रीमंती नाही का?पाच दिवसांच्या ट्रेकनंतर अन्नपूर्णा बेस कॅम्पच्या बोर्डपाशी पोहोचलो तेव्हा खूप आनंद झाला. कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटलं. मोहीम सफल केल्याचा अभिमान, हर्ष, उल्हास असे मिश्रित भाव होते सर्वांचे. .एकमेकांना मिठ्या मारत, शाबासकी देत, हस्तांदोलन करत सगळे आपल्या भावना व्यक्त करत होते. आमच्यासमोर एक भव्य, अनमोल बक्षीस होतं. जगातील दहाव्या क्रमांकाच्या उंच (२६,५४५ फूट) अन्नपूर्णा साउथ पर्वताच्या दर्शनाचं बक्षीस!संध्याकाळ होत आली. सूर्य अस्ताला जात होता. बोचरं वारं वाहत होतं. थंडीत कुडकुडत आम्ही एका टेकाडावर जाउन बसलो. अन्नपूर्णा पर्वतरांग सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेली पाहून स्तब्ध झालो. एक अद्भूत सौंदर्य साकारताना आम्ही पाहत होतो. निःशब्द करणारा प्रसंग होता तो!त्या दिवशी डायनिंग हॉलमध्ये विशेष आनंद जाणवत होता. फक्त हास्यकल्लोळ, गप्पा, गाणी आणि जल्लोष. आपण जणू आनंदाच्या गावी आहोत असंच वाटत होतं. खाणं उरकलं. गप्पा संपत नव्हत्या, पण आता थंडी मी म्हणत होती. झोपायला जाताना नेपाळी गाईडने आवर्जून मध्यरात्री बाहेरचे दृश्य पाहण्यास सांगितले. खूप झोप आलेली असूनही मनाचा हिय्या करून मध्यरात्री बाहेर गेलो. खूप थंडी होती. उणे ४ तापमान होते. बाहेर जायचं धाडस होत नव्हतं. पण दोघं बाहेर गेलो आणि समोर एक अवर्णनीय आविष्कार बघायला मिळाला..अत्यंत विलोभनीय दृश्य होतं ते! आसमंतात चंद्र आणि लखलखणाऱ्या ताऱ्यांच्या उजेडात अन्नपूर्णा अतिसुंदर दिसत होती. डोळ्यांत आणि मनात किती साठवायचं हे सगळं! मन आणि दृष्टी तृप्त होऊन पुन्हा खोलीत जाऊन उबदार रजईत शिरलो. पहाटे परत सूर्योदय बघण्यासाठी बाहेर पडलो. बर्फाच्या डोंगरावर पहाटेच्या वेळी पडणारी सूर्याची पहिली किरणं पाहून मन प्रसन्न झालं. अवघ्या बारा तासात अन्नपूर्णा पर्वताची एवढी विविध रुपं पाहून नतमस्तक झालो. मन कृतार्थ झालं. उत्साहात तीन दिवसांचा परतीचा ट्रेक सुरू केला.उतरताना सतत मागे पाहायचो, कारण मन भरतंच नव्हतं. ‘चल, भेटू पुन्हा लवकरच’ असं म्हणत जड अंतकरणानं अन्नपूर्णेचा निरोप घेतला. या ट्रेकमध्ये प्रामुख्याने युरोपियन, ब्रिटिश, पोलिश, कोरियन प्रवासी भेटले. सत्तरी ओलांडलेल्या एका कॅनडियन जोडप्याला भेटून विशेष आनंद झाला. ‘एज इज जस्ट अ नंबर’ या म्हणीची प्रचिती आली.-----------------.Career Opportunities in Electronic Vehicle : काय सांगता..? इलेक्ट्रॉनिक व्हेईकलमुळे जवळपास तीन कोटी रोजगार संधी उपलब्ध होणार?.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.