मृणाल तुळपुळे
व्हिएतनामला लांबलचक समुद्र किनारा लाभला आहे. तिथे सापडणारे भरपूर ऑयस्टर व प्रदूषणमुक्त हवा यांमुळे तिथले वातावरण मोत्यांच्या शेतीसाठी पूरक ठरते. व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर मोत्यांची शेती आणि निर्यात केली जाते. तिथे मोत्यांना सौंदर्य, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. मोती त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.