नरेंद्र जोशी
२०२४च्या पहिल्या तिमाहीमध्ये देशभरातील पहिल्या सात शहरांमध्ये लक्षणीय संख्येने घरांची विक्री झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.कोरोना काळात आलेल्या अनुभवानंतर मोठ्या घरांची गरज, घर हेच कामाचे ठिकाण होत असताना बदललेल्या गरजा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध सोयी या साऱ्यांचा अंतर्भाव मागील सुमारे दीड- दोन वर्षांपासून घर प्रकल्पांच्या उभारणीत होतो आहे.