डोपामाईन, ऑक्सिटोसिन, एनडॉर्फिन आणि सिरोटोनिन हे आपल्या भावभावना निर्माण करणारे आणि त्यांना नियंत्रित करणारे चार प्रमुख हार्मोन्स. हे हार्मोन्स म्हणजे एकप्रकारे आपल्या ‘आनंदाचा डोह’च असतात म्हणाना! मेंदूच्या मध्यभागी असलेल्या हायपोथॅलॅमस या एका गुंतागुंतीचा भागातून यातले अनेक हार्मोन स्रवतात.