वेगात गाडी चालवली म्हणजे ठरलेल्या वेळेपेक्षा आधी आपण इच्छित स्थळी पोहोचू शकतो, ही धारणा बाळगून अनेकजण ओव्हर स्पीडींग करत स्वतःचा जीव धोक्यात घालतातच, पण त्याचबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. पण वाहन जोरात पळवले म्हणजे आपण खरोखरच वेळेआधी पोहोचू शकतो का, की हा केवळ एक भ्रम आहे..?