Dasara : नवे काही उगवून येते तो दसरा

Maharashtra Dasara festival : नव्या धान्यांची सुफळ बरकतपूजा घरांत बहरून सुगंधी झालेली असते आणि घरात दसरा आलेला असतो
dasara
dasaraesakal
Updated on

प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख

दसरा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त! दिवाळीच्या आधी पंधरा दिवस येणाऱ्या दसऱ्याच्या सणाला एक वेगळंच महत्त्व आहे. अनेकजण या दिवशी नव्या व्यवसायाची, नव्या संकल्पांची सुरुवात करून सीमोल्लंघन करतात. नव्या खरेदीसाठीही हा मुहूर्त साधला जातो.

कुठलाही सण म्हटलं की चंगळच. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची, सणाच्या तयारीची, पै-पाहुण्यांची लगबग असते. दसरा सणाचाही असाच मोठा थाट! नवं काही सुरू करण्याची एक आनंदी प्रथा दसऱ्याशी घट्ट जोडलेली; अगदी एकमेकांशी जोडलेल्या आपट्याच्या पानांसारखी.

दसऱ्यानंतर दिवाळीचा सण अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेला असतो. त्याआधी ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असा एक सुखाचा तुरा आणि सुखाचाच तोरा घेऊन दसरा अंगणांत, घरीदारी, परिसरात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये फुलांच्या डवरलेल्या ताटव्यांसारखा फुलून येतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.