डॉ. मंदार दाताररंगबावऱ्या फुलांची देणी देणारा, पानाफुलातून सुखसंतोष शलाका टाकणारा हा ‘फेरीवाला’ वसंत हळूहळू माघार घेतोय आणि सार्वभौम हा ग्रीष्म बलोद्धत आपल्या दारावर दस्तक देतोय. वसंत असो वा शिशिर, निसर्गाचं एक अविरत चक्र कसं फिरतं हेच आपल्याला दाखवतात. .ऋतूबदलाच्या गुढ्यापताका, पालवीमध्ये मिरवे पिंपळबदलत जात्या भवतालाचे, मर्म सांगते त्याची सळसळऋतूंचा खांदेपालट ही सहज लक्षात येणारी गोष्ट नव्हे, मेघांच्या सीमा जशा एकमेकांमध्ये विरून जातात तसेच असते ऋतूंचे. आता गेल्या तीन-चार महिन्यांचा विचार करा, आपण थंडीच्या कुशीतून अलगद उन्हाळ्याच्या कोरड्या माळावर येऊन पडलो आहोत. जरा नीट निगुतीनं निरीक्षणं केली, भवतालाकडे जरा कुतूहलानं पहिलं, की हे सहज भासणारे पण टप्प्याटप्प्यानं होणारे बदल अनुभवता येतात. या निरीक्षणांची आपल्या कॅलेंडरमध्ये लिहिलेल्या ऋतूंशी सांगड घातली, की आपल्यासमोर वर्षाचं एक समग्र चित्र उभं राहतं. आपल्या मनात एक पुष्पदर्शिका आकारास येऊ शकते. आपल्या साहित्यात चैत्र-वैशाख म्हणजे वसंत; या अनुक्रमानं घ्यायचं झालं, तर दोन दिवसांनी येणाऱ्या गुढीपाडव्याला वसंत सुरू होणार. मग ज्येष्ठ-आषाढात येईल ग्रीष्म. पण आषाढाला ग्रीष्म ऋतूचा मास म्हणावं कसं? कारण आषाढाचा पहिला दिवस तर आपण पावसाच्या येण्यामुळे महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो. त्यामुळे हे ऋतूंचं पंचांग जरा नीट समजून घ्यायला हवं. आपल्याकडे महाराष्ट्रात हे ऋतूंचं चक्र उत्तर भारतातल्या (ज्याचा संस्कृत साहित्यात उल्लेख येतो) चक्राप्रमाणे मानून उपयोग नाही. कारण ऋतूंचं हे चक्र निगडित असायला हवं सौर पंचांगाशी. आपले मराठी महिने आहेत चांद्रपंचांगानुसार. आता हे ऋतू सौर पंचांगानुसार का मानायचे? तर, वनस्पतींचे फुलणं फळणं अवलंबून असतं ते दिवस किती मोठा आहे आणि सूर्यप्रकाश किती वेळ टिकणार आहे यावर. आणि ऋतूंचं बाह्यरूपडं कळतं ते हवापाण्यामुळं आणि वनस्पतींच्या फुलण्या-फळण्यामुळं. .मग आपल्याकडे महाराष्ट्रात वसंत ऋतू येतो कधी? आपण सात जूनला मृगाचा पाऊस येतो असं गृहीत धरून चाललो आणि त्या दिवशी वर्षाऋतूची सुरुवात असं मानलं, तर मग पुढचं सारं कोष्टक नीट बसतं. सात जून ते सहा ऑगस्ट वर्षा ऋतू, सात ऑगस्ट ते सहा ऑक्टोबर शरद. याच कालखंडात कधीतरी आपली शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा येते. पुढे सात ऑक्टोबर ते सहा डिसेंबर हेमंत. बोरकरांच्या कशी तुज समजावू सांग...मध्ये ‘हेमंती उष्ण हवा’ म्हणून जो उल्लेख आहे, तो आपण ‘ऑक्टोबर हिट’शी जोडून घेऊ शकतो. पुढे सात डिसेंबर ते सहा फेब्रुवारी शिशिर. होय तोच शिशिर ज्याचा ‘पतझड’ नावानं हिंदी साहित्यात उल्लेख असतो. याच शिशिरात आपल्या आसपासच्या वृक्षांना परावैराग्य येतं. काही वृक्षांची पानं सावकाश गळत राहतात, तर काहींचे बघता बघता खराटे होतात. शिशिर संपला की मग दारी येतो वसंतराणा, ऋतूंचा राजा! कोष्टकाप्रमाणे सात फेब्रुवारी ते सहा एप्रिल. अहो आश्चर्यम्! याच दरम्यान तर आपल्याकडचे सगळे वृक्ष फुलतात. पळस, पांगारे, सावरी, शिरीष, गणेर अन् अशी कितीतरी वृक्षमंडळी. फुलण्याच्या काळ थोडा अलीकडं-पलीकडं असेल, पण ते फुलतात एका निश्चित क्रमानं. एकदा वसंताचा हा कालखंड पक्का केला, की मग सात एप्रिल ते सहा जून हा ग्रीष्म अशी सारी संगतवारी लागते. दुर्गाबाई भागवतांनीही ऋतुचक्रमध्ये फाल्गुन अन् चैत्र हा वसंत असं म्हटलं आहे. आणि हो, आपली वसंत पंचमी नेमकी जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यानच येते आणि आपल्या या ऋतुचक्राच्या या नवीन कोष्टकाला पुरावा मिळतो.वसंत आणि ग्रीष्माच्या या आधिरेषेवर अनेक वृक्ष रंगीबेरंगी फुलं धारण करून सजलेले असतात. काही वृक्षांची केवळ फुलंच आकर्षक नसतात, तर कोशिंब, बेहडा यांसारख्या वृक्षांनी आपली कोवळी पानंही लालसर रंगात रंगवलेली असतात. रंगीत कोवळी पानं धारण करणारा आपल्या परिचयाच्या वृक्ष म्हणजे पिंपळ. हा पर्णांचा वर्णोत्सव पाहून बा.भ. बोरकर म्हणतात, झाडे राने उंच उडविती पर्णातून पताका.. शाखाशाखातून टाकती सुख संतोषशलाका... .आपल्याकडे पळस फुलतो वसंत ऋतूच्या आगमनाच्या खूपच आधी शिशिरात. पण वसंत येईपर्यंत त्याचं फुलणं रेंगाळत चालूच असतं. नंतर फुलते लालभडक काटेसावर अन् पाठोपाठ पिवळ्याधम्मक फुलांची गणेर. सावरीच्या पाठोपाठ सजतो पांगारा. रक्तवर्ण पांगाऱ्याची फुलं म्हणजे, आता आभाळ भेटले रे.. अंग फुलांनी पेटले रे... या पाडगावकरांच्या ओळींचं स्मरण. पळस-पांगारा ही जोडगोळी इतकी प्रसिद्ध की सह्याद्रीचं वर्णनच पांगारे पळसांच्या चवऱ्या तुजभवती असं आहे. सध्या ग्रीष्माच्या आगमनासोबत हा पांगाराही आपल्या परमोच्च बहरात आहे. त्यासोबत आहे पांढऱ्या फुलांचा वारस. पळस, पांगारे, वारस सारे कदाचित तुमच्या परिचयाचे असतील. पण क्वचितच कोणी पाहिली असेल कौशी. लालभडक, नळीसारख्या फुलांची कौशी फुलताना पाहिली तर तुम्हाला ‘बहार देखते रहे’ म्हणजे काय हे कळेल.शहरात याच वसंत आणि ग्रीष्माच्या पार्श्वभूमीवर अनेक वृक्ष बहरलेले दिसतात. आपल्या सर्वांचा लाडका अमलताश किंवा बहावा त्यापैकीच एक. पिवळ्या फुलांचे सुंदर घोस लेऊन फुलणारा बहावा पाहताक्षणीच प्रेमात पाडतो. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं..इतके सारे सोने मजला, अजून पहाणे झाले नाहीअमलताशच्या जर्द फुलांनी असे नहाणे झाले नाहीयाच दरम्यान नीलमोहोर किंवा जॅकारंडा फुललेला दिसतो. मूळचा परदेशी पण अनेक भारतीय वृक्षांच्या संगतीनं आपल्याकडे बहरणारा नीलमोहोर, आपल्या भारतीय वृक्षात दुर्मीळ असणाऱ्या जांभळ्या रंगसंगतीमुळे आकर्षक वाटतो. नीलमोहोरासारखाच पाहुणा म्हणजे सारी पानं गाळून स्वतःवर सोनेरी फुलांचा साज चढवलेला सोनमोहोर. चौकात सिग्नलला भर उन्हात उभं असताना दिसणारे नीलमोहोर आणि सोनमोहोर उन्हाच्या झळा जरा सुसह्य करतात. सोनमोहोर म्हणजे टॅबुबियाचे, गुलाबी फुलांचे दोन भाऊबंधही आत्ता फुलत आहेत. अफाट लोकप्रिय असणारा अन् फुलला की ज्याचा फोटो खात्रीनं वृत्तपत्रांमध्ये छापून येतो असा गुलमोहर अजून सर्वत्र फुललेला नाही. तो खरंतर फुलतो वसंतानंतर, त्यामुळं बहरलेल्या गुलमोहराचा फोटो अन् खाली ‘वसंताची चाहुल’ असा मथळा हे काही बरोबर नाही. .तंत्रविज्ञान आणि 'टेक्निक' मुळे सुखसोयी उपलब्ध, तारक वाटणारे तंत्र उद्या मारक ठरणार का?.शहरात कोठे कोठे आत्ता फुलतोय शिरीषही. शिरीष हादेखील वसंतोत्सवातला परमोच्च आविष्कार. शिरीषाची फुलं नुसतीच देखणी नाहीत, तर सुगंधीसुद्धा. या देखण्या फुलांसोबत असणारी कोवळी पालवी या वृक्षाचं सौंदर्य कितीतरी पटीनं वाढवते. कुठे कुठे मुद्दाम लावलेला वरुणही आहे... शुभ्र पांढऱ्या फुलांचा अन् सोबत हिरवी-पोपटी कोवळी पालवी मिरवणारा. यासोबतच गुलाबी करंज नावाचा वृक्षही शहरांमध्ये दिसतो. त्याच्या गुलाबी, निळ्या फुलांचा सडा जमिनीवर जेव्हा पडतो, तेव्हा तो इतका छान दिसतो की रस्ते स्वच्छ करणाऱ्यांना त्यावर झाडू फिरवावासा वाटत नसेल. आसूपालव, समुद्रफळ, मारखामिया याही वृक्षांचा सध्या बहरण्याचा हंगाम आहे. जंगलात नद्या, ओहोळांच्या कडेला वाढणाऱ्या सीतेच्या अशोकाला गच्च हिरव्यागार पानांमध्ये एकमेवाद्वितीय देखणी रक्तवर्ण फुलं अवतरली आहेत. कुंभा, जांभूळ, सुरंगी यांसारखे वृक्षही सदाहरित वनांमध्ये फुलत आहेत. पानगळी वनांमध्ये पाचुंदा, सेमला कांचन, बारतोंडी, कळंब, शिवण, मेडशिंगी यांसारखी वृक्षमंडळी सध्या बहरात आहेत. आणि हो, पाडव्याच्या दिवशी ज्याचं विस्मरण अशक्य आहे तो कडुलिंबसुद्धा! वृक्षांसोबत काही देखण्या वेली, झुडपंसुद्धा जंगलात सध्या बहरात आहेत. जाई-जुईच्या कुळातील कुसर एक असंच निसर्गलेणं. कुसरसोबत फुलत असते करवंद. करवंदाची फुलं शुभ्र पांढरी, अत्यंत आकर्षक अन् सुगंधी. या साऱ्या वनफुलांचं सौंदर्य पहाण्यासाठी वाकडी वाट करून रानात जायला हवं.तर, रंगबावऱ्या फुलांची देणी देणारा, पानाफुलातून सुखसंतोष शलाका टाकणारा हा ‘फेरीवाला’ वसंत हळूहळू माघार घेतोय आणि सार्वभौम हा ग्रीष्म बलोद्धत आपल्या दारावर दस्तक देतोय. वसंत असो वा शिशिर, निसर्गाचं एक अविरत चक्र कसं फिरतं हेच आपल्याला दाखवतात. आपण ते आपल्या परीनं फक्त समजून घ्यायचं. सुप्रसिद्ध गजलकार वा. न. सरदेसाई म्हणतात तसं,हे का कुणी फुलांना सांगायला हवे? त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे!-----------.शहराशहरांमधल्या घसरत्या वाहतूक शहाणिवेचे सारे पाईक असंस्कृत आणि अशिक्षित .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.