Healthy Lunch Recipe : रोजच्या धावपळीमध्ये दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात काय बनवावे? असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. रोजचे तेच तेच साधे जेवण खाऊन कंटाळा ही येतो. त्यामुळे, काहीतरी हेल्दी मात्र चमचमीत खाण्याची इच्छा होते.
अशावेळी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मेथी मटर मशरूम मलाई बनवू शकता. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता. ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या रेसिपीबद्दल.
एक कप ताजे किंवा फ्रोझन हिरवे वाटाणे (मटार)
२०० ग्रॅम बटण मशरूमचे काप
१ कप ताजी मेथीची पाने चिरून
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
१ इंच किसलेला आल्याचा तुकडा, ४-५ लसूण पाकळ्या चिरलेल्या
अर्धा कप काजू (कोमट पाण्यात १५-२० भिजवून घ्यावेत)
अर्धा कप हेवी क्रीम
१ टीस्पून जिरे
१ टीस्पून गरम मसाला
१ हिरवी मिरची
१ टीस्पून धने पावडर
अर्धा टीस्पून वेलची पावडर
चवीनुसार मीठ
२ टेबलस्पून तूप किंवा तेल
गार्निशसाठी ताजी कोथिंबीर
एक मोठा तवा किंवा कढई मध्यम आचेवर गरम करावी आणि त्यात १ टेबलस्पून तूप किंवा तेल घालावे.
तेल गरम झाल्यावर मशरूम घालून ते हलके तपकिरी होईपर्यंत परतावेत. नंतर बाजूला काढून ठेवावेत. त्याच कढईत उरलेले तूप किंवा तेल घालावे आणि नंतर जिरे घालावे.
नंतर चिरलेला कांदा घालून सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतावा. किसलेले आले आणि चिरलेला लसूण घालावा आणि कच्चेपणा जाईपर्यंत आणखी २-३ मिनिटे शिजवावे.
दरम्यान, ब्लेंडरमध्ये भिजवलेले काजू आणि अर्धा कप पाणी घेऊन ब्लेंड करावे. स्मूथ पेस्ट होईपर्यंत ब्लेंड करावे.
ही पेस्ट कढईत घालावी मिश्रणापासून तेल वेगळे होईपर्यंत शिजवावे. धने पूड आणि वेलची पावडर मिसळावी.
हे सर्व २-३ मिनिटे शिजवावे. मग कढईत चिरलेली मेथीची पाने घालावीत आणि काही मिनिटे शिजू द्यावे.
शेवटी तळलेले मशरूम आणि मटार घालावेत आणि ढवळून घ्यावे. ५-७ मिनिटे उकळू द्यावे. वरून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे.
हलक्या हाताने ढवळावे. सर्व्ह करण्यापूर्वी मेथी मटर मशरूम मलईला ताज्या कोथिंबिरीने सजवावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.