डॉ. बाळ फोंडकेमाणसाच्या समग्र शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांची निश्चिती करणारी जनुकं त्याच्या पेशींमध्ये सामावलेली असतात. मानवाच्या भावनिक आणि वागणुकीविषयक गुणधर्मांनाही त्याची अंगभूत जनुकं जबाबदार असतात, असं आता समोर आलं आहे. .चेंगीझ खान हा एक क्रूरकर्मा, हुकूमशहा म्हणूनच आपल्याला परिचित आहे. पण तो मंगोलियाचा अनभिषिक्त सम्राट होता, शूर लढवय्या होता आणि त्यानं आशिया खंडातल्या विस्तृत प्रदेशावर आपला अंमल प्रस्थापित केला होता याची क्वचितच दखल घेतली जाते. त्याच्या नावे आणखी एक आगळावेगळा विक्रम नोंदवला गेला होता, याची तर कुणाला माहितीही नाही.त्याकाळच्या प्रथेनुसार राजवाड्यांमध्ये भलेमोठे जनानखाने असत. त्यात अधिकृत-अनधिकृत राण्या, कुणबिणी, भोगदासी यांची भरमार असे. चेंगीझ खानही याला अपवाद नव्हता. त्याच्या जनानखान्यात त्यानं युद्धात जिंकून घेतलेल्या प्रदेशातील स्त्रियांची भरच पडत असे. यामुळे त्याच्या नावे किती वंशज जन्माला आले याची गणतीच नव्हती. आजवरच्या इतिहासात याची ठोस नोंदही नाही. गोष्ट एवढ्यावर थांबत नाही. कारण त्याच्या संततींनीही त्याचाच मार्ग अनुसरला होता. न्यू यॉर्क टाइम्सनं प्रसिद्ध केलेल्या एका आकडेवारीनुसार, चेंगीझ खानाचा सर्वात मोठा मुलगा टुशी यालाच ४० मुलगे झाले होते. १२६०मध्ये पर्शियातील इतिहासकार अटा अल जुवेनी यानं आपल्या बखरीत लिहून ठेवलं आहे, की आजमितीला चेंगीझ खानाचे निदान २० हजार वंशज ऐशोआरामाचं जीवन व्यतीत करत आहेत. त्यानंतरच्या आठ शतकांमध्ये त्यात भरच पडली असणार. याच अनुषंगानं संशोधकांनी २००३ साली चेंगीझखानाचे दीड कोटीहून अधिक वंशज असल्याचा निष्कर्ष काढला होता. म्हणजेच त्याचा जनुकीय वारसा धारण करणाऱ्या तेवढ्या व्यक्ती आज निरनिराळ्या ठिकाणी वास्तव्य करून असल्या पाहिजेत.अर्थात हे ढोबळ अनुमान झालं. याविषयीचा एकही विश्वासार्ह पुरावा सादर करण्यात आला नव्हता. पण ह्युमन जीनोम प्रकल्पातून मानवप्राण्याच्या यच्चयावत जनुकांचा आराखडा मिळवल्यानंतर या संशोधनाला धार आली. चेंगीझ खानाच्याच नव्हे, तर कोणाच्याही जनुकीय वारशाची तर्कसंगत छाननी करण्याची सुविधा प्राप्त झाली. .माणसाच्या समग्र शारीरिक आणि शरीरक्रियाविषयक गुणधर्मांची निश्चिती करणारी जनुकं त्याच्या पेशींमध्ये सामावलेली असतात. मानवाच्या भावनिक आणि वागणुकीविषयक गुणधर्मांनाही त्याची अंगभूत जनुकं जबाबदार असतात, असं आता समोर आलं आहे. ही जनुकं गुणसूत्रांच्या तेवीस जोड्यांमध्ये, म्हणजेच एकूण ४६ गुणसूत्रांवर वस्ती करून असतात. जोडीदारांपैकी एक वडिलांचा वारसा असतो, तर दुसरा आईचा. म्हणजे कोणत्याही जनुकाच्या जोडीतला एक अवतार वडिलोपार्जित असतो, तर दुसरा मातेची देणगी असतो. या जनुकीय गुणसूत्रांच्या जोड्यांमधली तेविसावी जोडी जन्माला येणाऱ्या व्यक्तीचं लिंग निर्धारित करते. जर त्या जोडीतले जोडीदार समानधर्मी, म्हणजे दोन्ही ‘एक्सएक्स’ प्रकारचे असतील, तर ती व्यक्ती स्त्री होते. उलटपक्षी जर ते विषमधर्मी, म्हणजे एक ‘एक्स’ आणि दुसरा ‘वाय’ असेल तर ती व्यक्ती पुरुष होते. यात गमतीचा भाग असा, की ‘वाय’ गुणसूत्र अपत्यांना केवळ वडिलांकडूनच मिळतं, आणि तेही केवळ पुरुष संततीलाच. त्यामुळं त्या गुणसूत्राची छाननी करत पुरुष संततीला पित्याच्या बाजूची वंशवेल वृद्धिंगत करणं शक्य होतं. याच प्रणालीचा वापर करत चेंगीझ खानाच्या जनुकीय वारशाची व्याप्ती अचूकपणे ठरवली गेली आहे.तरीही ही केवळ पन्नास टक्क्यांची शाश्वती झाली. कारण यातून चेंगीझ खानाचा जनुकीय वारसा मिळालेल्या फक्त पुरुष वंशजांचीच माहिती मिळते. त्याला, आणि त्याच्या वंशजांनाही, फक्त मुलगेच झाले असं नाही. किंवा त्याकाळी स्त्रीभ्रूणहत्या होत नसल्यामुळं फक्त पुरुष संततीच जगली आणि त्यांनीच चेंगीझ खानाच्या जनुकांचा प्रसार केला अशातलीही बाब नाही. तथापि, या संशोधनातूनही आजमितीला चेंगीझ खानाचे कोट्यवधी वंशज हयात असल्याचा पुरावा मिळाला आहे. थोडक्यात त्याचा जनुकीय वारसा आज एवढ्या मोठ्या संख्येनं आणि कित्येक शतकांनंतरही जतन झाला आहे. .हा वारसा सर्वात मोठ्या संख्येत असल्यामुळं या बाबतीतला हा उच्चांक मानून गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये याची नोंद करायची का? या प्रश्नाचं नकारार्थी उत्तर जनुकशास्त्रज्ञांनी दिलं आहे. २०१५ साली त्यांनी याचा धांडोळा घेण्याचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी त्यांनी आशिया खंडातल्या १२७ वेगवेगळ्या भागांमधील तब्बल पाच हजार पुरुषांच्या जनुकांची छाननी केली. त्यात त्यांना असं दिसून आलं, की किमानपक्षी २०जणांच्या बाबतीत ‘वाय’ गुणसूत्रातील अकरा क्रमवाऱ्या समान होत्या. म्हणजेच या अकराजणांनी मोठ्या संख्येनं आपला जनुकीय वारसा आपल्या वंशजांना बहाल केला होता.या अकराजणांपैकी एक चेंगीझ खान होता असं गृहीत धरलं, तरी त्याच्या व्यतिरिक्त निदान दहाजण तरी असे बहुप्रसवी होते. ह्या सगळ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांच्यातल्या एकाची ओळख पटली आहे. तो होता गियाकोन्गा. हा चीनमधील किंग घराण्याची स्थापना करणाऱ्या राजाचा आजा होता. २००५ साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार आजच्या उत्तर चीनमध्ये त्याचे किमान दीड लाख वंशज वास्तव्य करून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतरच्या वीस वर्षांत त्याचा वंश अधिकच फोफावला असणार यात शंका नाही. .तरीही नऊजण उरतातच. त्यांची ओळख अजूनही पटली नसली, तरी आधुनिक जनुकशास्त्रीय संसाधनं वापरून या जनुकांमधील उत्परिवर्तनाचा धांडोळा घेतला जात आहे. त्यांची जनुकं ज्या प्रदेशांमध्ये मोठ्या संख्येनं मिळाली होती, त्यावरून हे मूळ पुरुष त्याच ठिकाणी आपला अंमल गाजवून होते असं समजायला हरकत नसावी. तसा विचार केल्यास आशियातील विस्तृत प्रदेशात इसवी सनापूर्वी २१००पासून ते इसवी सन ३००पर्यंतच्या कालखंडात त्यांनी आपला वंश फोफावायला सुरुवात केली होती, असा निष्कर्ष निघतो. या काळात भटक्या जमातीही होत्या आणि शेतीचा शोध लागल्यामुळं एके ठिकाणी वस्ती करून राहिलेल्या टोळ्याही होत्या. त्यापैकी दोन्ही संस्कृतींमध्ये एकाधिकारशाहीला मान्यता मिळालेली होती. त्यामुळं इतर प्राण्यांच्या जीवनप्रणालीनुसार ज्याच्या ठायी तो अधिकार एकवटला असायचा त्यांना नरपुंगव, म्हणजेच अल्फा मेल समजलं जायचं. त्याला टोळीतील यच्चयावत स्त्रियांचा उपभोग घेण्याची मुभा असे. या प्रणालीतूनच बहुप्रसवी पुरुषांची परंपरा प्रस्थापित झाली होती. त्यांचाच जनुकीय वारसा सर्वदूर पसरत गेला होता. एकट्या चेंगीझ खानाचेच वंशज आज लक्षणीय संख्येनं सापडतात असं नाही.(डॉ. बाळ फोंडके नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक व विज्ञानकथा लेखक आहेत.)-----------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.