डॉ. सदानंद मोरे
इतर प्राण्यांप्रमाणेच माणसावरही नैसर्गिक मर्यादा आहेत. तथापि माणूस, त्याने त्याच्या बुद्धीने शोधलेल्या निसर्गनियमांच्या आधारेच या मर्यादा कशा उल्लंघिता येतील याचा विचार करीत, त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान सिद्ध करतो. यासाठी उपलब्ध असलेली निसर्गदत्त बुद्धी कमी पडते हे लक्षात घेऊनच त्याने कृत्रिम बुद्धीची कास धरली असे म्हणता येईल काय?