डॉ. सदानंद मोरे
शेती हा मानवाने निसर्गामध्ये केलेला पहिला अर्थपूर्ण हस्तक्षेप. या हस्तक्षेपामुळे मानवाच्या इतर प्राण्यांपासून वेगळे असण्यावर शिक्कामोर्तब झाले, असे म्हणायला हरकत नाही. एकतर त्यामुळे त्याचे इतर प्राण्यांप्रमाणे असणारे निसर्गावरील अवलंबित्व संपुष्टात आले.
निसर्ग जेव्हा आणि जितके देईल त्यावर अवलंबून राहून आयुष्य जगायचे दिवस आता संपले आणि निदान काही प्रमाणात तरी निसर्गनियमांच्या चौकटीत का होईना, माणसाला स्वतःच्या मर्जीप्रमाणे अन्नपदार्थांची प्राप्ती करता येणे शक्य झाले. पण त्याच्या या हस्तक्षेपामुळे निसर्गातही बदल होऊ लागला.