डॉ. अविनाश भोंडवेरुग्ण आजारी नसतो, पण आपल्याला काही ‘मोठ्ठा आजार’ झाला आहे हा भ्रम आणि त्या आजाराची सतत चिंता, हाच एक आजार होऊन बसतो. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत हायपोकाँड्रियासिस किंवा इलनेस अँक्झायटी डिसऑर्डर (आयएडी) असे म्हणतात. .“माझ्या बगलेत गाठ झाली आहे. मला कर्करोग तर नसेल ना?”“सकाळपासून छातीत खूप दुखतेय, हृदयविकाराचा झटका असेल का?”“भयंकर डोकेदुखी आहे. नक्कीच मला मेंदूचा ट्युमर झाला आहे.”अनेकदा अशा गंभीर तक्रारी घेऊन दवाखान्यात काही रुग्ण येतात. आपल्याला खूप गंभीर आजार झाला आहे, अशी शंका त्यांना मनोमन येत असते. त्यांच्या शारीरिक तपासणीतच डॉक्टरांच्या लक्षात येते, की हा काही गंभीर आजार नाही. काखेतली गाठ म्हणजे एक पुळी आहे, छातीतले दुखणे हे बरगड्यांच्या किंवा छातीवरच्या स्नायूंच्या वेदना आहेत. भयंकर डोकेदुखी सायनुसायटिसमुळे आहे.अशा रुग्णांचा डॉक्टरांच्या नुसत्या सांगण्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे त्यांच्या त्या ‘गंभीर’ आजारांबाबतच्या शंका दूर करण्यासाठी इत्थंभूत तपासण्या केल्या जातात. त्यांना तो आजार झालेला नाही हे निष्पन्न होते. रुग्णाचे समाधान होते, पण काही काळापुरतेच. काही दिवसांनी त्याला तशीच लक्षणे पुन्हा जाणवतात, मग तो रुग्ण डॉक्टर बदलतो आणि पुन्हा तेच! पुन्हा त्याला काही आजार नसल्याचे निदान होते. हे प्रकार पुन्हा पुन्हा होत राहतात. परिणामी रुग्णाला तो आजार नसतो, पण आपल्याला काही ‘मोठ्ठा आजार’ झाला आहे हा भ्रम आणि त्या आजाराची सतत चिंता, हाच एक आजार होऊन बसतो. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत हायपोकाँड्रियासिस किंवा इलनेस अँक्झायटी डिसऑर्डर (आयएडी) असे म्हणतात.एका दृष्टीने हायपोकाँड्रियासिस हा वैद्यकीय आजार नसला, तरीही त्याने पीडित असलेल्या अगणित व्यक्ती सर्वत्र आढळतात. तसे पाहिले, तर त्या व्यक्तींच्या चिंता त्यांच्यापुरत्या पूर्ण वास्तविक असतात आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजात गंभीर व्यत्यय आणत असतात. .लक्षणेया आजाराची लक्षणे नक्कीच नजरेत भरण्यासारखी असतात. यामध्ये-आजार होण्याच्या भीतीने काही प्रकारच्या व्यक्तींना किंवा विशिष्ट ठिकाणांना टाळणे,आजारांची लक्षणे आणि नवनवे आजार, विकार यांची माहिती घेण्यासाठी सतत इंटरनेट धुंडाळत राहणे,आपल्या शारीरिक त्रासांबद्दल आणि आरोग्याच्या समस्यांबद्दल सतत इतरांशी बोलणे,एखादा त्रास होतोय असे वाटल्यामुळे दैनंदिन कामकाजात सतत व्यत्यय येणे,शरीरात कोणतेही लक्षण आढळले, तर ते एखाद्या गंभीर आजारामुळेच झाले आहे असे मानणे आणि त्या आजाराबाबत असलेल्या अर्धवट माहितीमुळे घाबरून जाणे,सतत रक्तदाब, तापमान, रक्ताच्या तपासण्या, ईसीजी, स्कॅन करत राहणे आणि या चाचण्या केल्या जात असताना कमालीचे चिंताग्रस्त होणे,डोकेदुखी, सांधेदुखी किंवा घाम येणे यांसारख्या किरकोळ शारीरिक लक्षणांबद्दल नको इतकी सतर्कता आणि भीती वाटणे,काही त्रास नसला तरी तपासणीसाठी वारंवार डॉक्टरांची भेट घेणे,आपण आजारी आहोत किंवा गंभीर आजाराने बाधित आहोत अशा विचाराने कमालीचा त्रास करून घेणे, अशा लक्षणांचा समावेश होतो.चिंतेचे चक्रहायपोकाँड्रियासिसमुळे शरीरामध्ये एक दुष्टचक्र तयार होते. अनामिक आजारपणाच्या भीतीपोटी त्या रुग्णांचे सर्व लक्ष शारीरिक कार्यांवर केंद्रित होते. या वाढलेल्या सामान्य संवेदनांना, ते एखाद्या आजाराची लक्षणे समजू लागतात. त्यातून त्यांची चिंता आणखी वाढते. त्याचे पर्यवसान डोकेदुखी, पोटदुखी किंवा चक्कर येणे अशा शारीरिक लक्षणांप्रमाणे होते, ज्यामुळे आपण आजारी असल्याचा त्यांचा विश्वास आणखी दृढ होतो. .आजाराची कारणेहायपोकाँड्रियासिसचे नेमके कारण कोणते, याबाबत वैद्यकीय संशोधन सुरू आहे; परंतु ही रोगभ्रमाची स्थिती उद्भवण्यामागे अनेक घटकांचे योगदान असते, याची नोंद केली गेली आहे.जैविक घटक : मेंदूमधील काही विशेष विभाग चिंता आणि आकलनशक्तीशी संबंधित असतात. या विभागात घडणाऱ्या काही अस्वाभाविक क्रियाकल्पांचा हायपोकाँड्रियासिस निर्माण होण्याशी संबंध असतो, असे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे.मानसशास्त्रीय घटक : चिंता, नैराश्य किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर असे मनोविकार असलेल्या व्यक्तींमध्ये हायपोकाँड्रियासिस उद्भवण्याची शक्यता जास्त असते.जीवनातील अनुभव : एखाद्या व्यक्तीला बालपणात स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणाचे काही तीव्र अनुभव आले असल्यास किंवा वैद्यकीय दृष्टीने एखादी दुःखद घटना घडली असल्यास, त्याच्या आरोग्याविषयीच्या चिंता वाढतात. त्यातून हा विकार विकसित होऊ लागतो.व्यक्तिमत्त्वातील भावनिक घटक : नकारात्मक भावनांकडे कल असलेल्या, स्वतःकडे लक्ष वेधून घेऊ इच्छिणाऱ्या किंवा इतरांकडून सांत्वन करवून घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये हायपोकाँड्रियासिस आढळून येतो.आयुष्यावर होणारे परिणाम ः हायपोकाँड्रियासिस असलेल्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेवर या विकारांचा लक्षणीय परिणाम होतो.सातत्याने आजारपणाच्या चिंतेत गुंतल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर खालील परिणाम झालेले आढळतात सामाजिक अलगाव : आपल्या आजारपणाचा संसर्ग इतरांना होईल या विचाराने, किंवा आपण फार अशक्त झालो आहोत या भीतीने या व्यक्ती सामाजिक समारंभात सहभागी होत नाहीत. त्यामुळे समाजापासून ते वेगळे पडतात.कामात व्यत्यय : आरोग्याबाबतच्या चिंतेमुळे त्यांची कामामधील एकाग्रता, निर्मिती क्षमता, उत्पादकता यावर परिणाम होतो. अशा व्यक्तींमध्ये आजारपणाच्या निमित्ताने वरचेवर कामावर गैरहजर राहण्याची प्रवृत्ती बळावलेली आढळते.नातेसंबंधातील ताण : सतत आजाराबाबत चर्चा आणि सतत डॉक्टरांकडे जाणे, रुग्णालयात भरती होणे, वेगवेगळ्या तपासण्या करत राहणे अशा सवयींमुळे कौटुंबिक संबंध, नातेसंबंध, मित्रपरिवार यांवर परिणाम होऊ लागतो.आर्थिक ताण : निरनिराळ्या डॉक्टरांच्या वारंवार भेटी आणि गरज नसतानाही केलेल्या महागड्या वैद्यकीय चाचण्या असे अनावश्यक खर्च सातत्याने होत राहिल्याने आर्थिक ताण पडत राहतो.हायपोकाँड्रियासिसचे निदान करताना, तत्सम वाटणाऱ्या दोन आजारांमध्ये फरक करावा लागतो.नोसोफोबिया : हायपोकाँड्रियासिस आणि नोसोफोबिया या दोन्हींमध्ये आजाराची भीती असते. यातला फरक हा भीतीच्या नेमक्या प्रकारात असतो. नोसोफोबिया म्हणजे कर्करोग किंवा मधुमेहासारखा विशिष्ट आजार होण्याची भीती. हायपोकाँड्रियासिसमध्ये विद्यमान शारीरिक लक्षणे ही निदान न झालेल्या रोगाचा परिणाम असतील, अशी भीती असते.मॅलिंगरिंग : हायपोकाँड्रियासिस आणि मॅलिंगरिंग यातील फरकही लक्षात घेणे आवश्यक आहे. आर्थिक नुकसानभरपाई मिळवण्यासाठी, कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी किंवा एखादी जबाबदारी टाळण्यासाठी जाणूनबुजून एखाद्या आजाराची बतावणी करणे किंवा आजाराचे नाटक करणे म्हणजे मॅलिंगरिंग. हायपोकाँड्रियासिस तसा नसतो. या विकारात लोकांना खरेच ती लक्षणे असतात, ते लोक बतावणी करत नाहीत. त्यांना आपल्याला आजार झाल्याची, किंवा गंभीर स्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याची खात्री असते. .उपचारहायपोकाँड्रियासिस हे एक दुष्टचक्र असते. त्यावर उपचार करण्यासाठी हे चक्र तोडणे आवश्यक असते. हा विकार उपचार करून बरा करण्याजोगा असतो. याबाबत काही प्रभावी उपचारपद्धती -संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी) : या उपचारात रुग्णाच्या मनामध्ये चिंता वाढवणारे, नकारात्मक विचार जागे करणारे प्रसंग कोणते, हे शोधले जाते. असे प्रसंग उद्भवल्यास, त्या प्रसंगांशी दोन हात करून, त्यातून बाहेर कसे पडायचे हे रुग्णाला शिकवले जाते. यामध्ये एक्स्पोजर थेरपीचादेखील समावेश असतो. यामध्ये रुग्णासाठी अप्रिय प्रसंग निर्माण करून, रुग्ण त्यात कसा वागला आणि कसे वागायला पाहिजे? याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शारीरिक संवेदनांमधून डोके वर काढणाऱ्या आजाराच्या भीतीचा प्रतिसाद हळूहळू कमी होत जातो.औषधोपचार : अँटिडिप्रेसंट (निराशाविरोधी) किंवा अँटिअँक्झायटी (चिंताशामक) औषधे देऊन चिंतेला नियंत्रित केले जाते.मनाच्या विश्रांतीची तंत्र : सखोल श्वासोच्छ्वास, माइंडफुलनेस मेडिटेशन, रिलॅक्सेशन टेक्निक्स यासारखी मनाच्या विश्रांतीची तंत्र शिकल्याने चिंताग्रस्त लक्षणे नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.समर्थन गट (सपोर्ट ग्रुप) : हायपोकाँड्रियासिसचा विकार असलेल्या इतर व्यक्तींशी संपर्क साधल्याने, यापूर्वी या विकारातून बऱ्या झालेल्या व्यक्तींशी संपर्क साधणे, त्यांचे मार्गदर्शन मिळवणे हे केल्याने आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते.स्वयंअनुशासन : हायपोकाँड्रियासिससारख्या आजार नसताना आजार अनुभवण्याच्या विकारातून मुक्त होण्यासाठी काही बाबतीत स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. याकरिता रुग्णांनी आजाराची भीती वाटणाऱ्या लक्षणांचा प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठपणे विचार करावा. आपल्याला आवश्यक असलेल्या उपचाराच्या पर्यायांबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आणि चिंता विकारांमध्ये तज्ज्ञ असलेल्या थेरपिस्टचा समावेश करण्याचा विचार करावा.हायपोकाँड्रियासिससह निरोगी जीवन जगणे अगदीच शक्य आहे. हायपोकाँड्रियासिसचे निराकरण लगोलग होत नसले, तरी त्याचे प्रभावीपणे नियंत्रण करणे शक्य असते. त्यासाठी आपल्या वर्तनाबाबत काही सीमारेषा बाळगणे आवश्यक असते. यामध्ये -आरोग्य माहिती शोधण्यावर मर्यादा : ऑनलाइन पद्धतीने आजारांच्या लक्षणांवर संशोधन करण्यासाठी किती वेळ घालवायचा याच्या सीमा निश्चित कराव्यात.आरोग्यदायी सवयींचे पालन करणे : नियमित व्यायाम, निरोगी खाणे, योग्य वेळी योग्य काळ झोपणे, शारीरिक स्वच्छता आणि मेडिटेशन यामुळे सर्वांगीण आरोग्याची पातळी उंचावते आणि चिंताही कमी होऊ शकते.परिस्थितीशी सामना : जेव्हा चिंता उद्भवते, तेव्हा तिचे नियंत्रण करण्यासाठी विश्रांती तंत्र, मेडिटेशन, शारीरिक व्यायाम करणे उपयुक्त ठरू शकते.नकारात्मक विचारांना आव्हान देणे : उद्भवणाऱ्या लक्षणांचे जे आपत्तीजनक अर्थ स्वतःच लावले जातात, त्यांचा फेरविचार करून ते कितपत रास्त आहेत? याचा विचार करण्याची सवय लावावी.सपोर्ट नेटवर्क तयार करा : या समस्यांबद्दल विश्वासू मित्र आणि कुटुंबीयांशी बोलावे, कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांचे साहाय्य मागावे आणि गरज असेल तेव्हाच वैद्यकीय मदत घ्यावी.--------------------.जनुकामध्ये बदल होऊन नवं वाण तयार होण्याची प्रक्रिया आहे तरी कशी? जाणून घ्या जनुकीय वारशाच्या विज्ञान कथा .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.