डॉ. सदानंद मोरे
गोहरबाई आणि बालगंधर्वांचे नाते हा त्याकाळच्या मराठी रंजनाच्या वर्तुळातील एक कुतूहलाचा व अनुषंगाने गॉसिपचा विषय होता. या प्रकरणावरील बरेचसे लिखाण साप्ताहिक सकाळमध्ये ‘लोकमान्य ते महात्मा’ लिहिताना माझ्या वाचनात येत होतेच, एक अभ्यासक आणि नाटककार म्हणून मला हा विषय आव्हानात्मक वाटला.