अद्भिः सर्वाणि भूतानि जीवन्ति प्रभवन्ति च । (महाभारत, शान्ति पर्व) -सर्व जीव पाण्यापासून जन्माला येतात आणि जगतात.
पाणी जीवन आहे. पाणी जपून वापरा. पाण्याचा योग्य वापर करा. पाण्याचा पुनर्वापर करा. सुरुवात स्वतःपासूनच करा. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे आणि थेंबनथेंब वाचवण्यासाठी तुम्ही केलेली प्रत्येक कृती महत्त्वाची आहे. जलकार्यक्षम उपकरणे वापरा. जलपुनर्भरण प्रणाली वापरा. आपला पाण्याचा वापर पुन्हापुन्हा तपासा आणि आवश्यक तेथे पुनर्नियोजन करा. पाणी शिळे होत नाही. पाण्याची उपलब्धी गृहीत धरू नका.