सामान्य माणसाच्या आयुष्यात मिळकत खरेदी ही एक महत्त्वाची बाब असते. घर, फ्लॅट, प्लॉट या स्वरूपात मिळकत खरेदी होत असते. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात विविध प्रकारचे दस्त नोंदविणे गरजेचे असते. साठेखत, खरेदीखत, भाडेपट्टा, गहाणखत अशा प्रकारचे दस्तांचे प्रकार आहेत. आता ही दस्त नोंदणी म्हणजे काय? दस्त दुय्यम निबंधकाकडे सादर करणे म्हणजे काय? दस्त स्वेच्छेने दाखल करणे, नोंदविणे म्हणजे काय? याबाबत थोडक्यात माहिती घेऊया...