सुलभा प्रभुणेआता काही दिवसांनी थंडी वाढेल. अशा वेळी गरमागरम सूप आणि सारांचा आस्वाद घेण्यासारखा आनंद दुसऱ्या कशात नाही. या सूप आणि सारांच्या अनोख्या रेसिपी नक्कीच तुमच्या मदतीला येतील..सिल्की सूपवाढपचार ते पाच कपसाहित्यदीड कप भाज्यांचा अर्क (व्हेजिटेबल स्टॉक), अर्धी वाटी दुधी भोपळा व २ गाजरांचा कीस, चवीनुसार मीठ व आले, ३ मिरी, १ लवंग व दालचिनी, हिंग, मिरची, १ कप दूध.कृतीभाज्यांचा कीस परतून घ्यावा. त्यात आले व लसूण बारीक करून घालावे. त्यात भाज्यांचा अर्क घालावा. नंतर मिरी, लवंग, दालचिनी व मिरची घालून उकळावे. उकळल्यावर त्यामध्ये आवडीनुसार चवीपुरते मीठ, हिंग घालावे. सर्वात शेवटी दूध घालून गॅस बंद करावा. दुधामुळे सूप दाट होते. .डाळींचे सूपवाढपचार ते पाच कपसाहित्यपाऊण वाटी तूर, मूग, उडीद डाळ (शक्यतो दोन किंवा तीन डाळींचे मिश्रण वापरावे), १ बारीक चिरलेला टोमॅटो, ४ ते ५ लसूण पाकळ्या, किसलेले आले, हिरवी मिरची, थोडी चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून धने-जिरे पूड, १ चमचा हिंग, १ चमचा लिंबाचा रस व अर्धा चमचा साखर.कृतीडाळी कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. कढईत तुपावर हिंग, मिरची व नंतर टोमॅटो घालून परतावे. त्यावर शिजलेली डाळ घालून ती जरा परतून नंतर त्यात चार वाट्या पाणी घालावे. ते उकळल्यावर चवीपुरते मीठ, धने-जिरे पूड, आले व लसूण (ठेचून किंवा बारीक काप करून) घालावे. नंतर आवडीनुसार अर्धा चमचा साखर घालावी. सूप पिण्याआधी त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालावा. त्यामुळे सूप अधिक चवदार होईल.टीप : डाळीचे प्रमाण कमी-जास्त करून हे सूप कमी-जास्त घट्ट करता येते..सोनेरी सकाळवाढपचार ते पाच कपसाहित्यतीन कप भाज्यांचा अर्क (व्हेजिटेबल स्टॉक), १ वाटी मक्याच्या कणसाचे दाणे (स्वीटकॉर्न), अर्धी वाटी गाजराचा किंवा लाल भोपळ्याचा कीस, पाव वाटी भिजवलेले मोडाचे मूग, १ मिरची, चवीनुसार आले, मिरपूड, आवश्यकतेनुसार कोथिंबीर, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी किसलेले पनीर.कृतीमक्याचे निम्मे दाणे मिक्सरमध्ये बारीक करावेत. त्यात तीन वाट्या भाज्यांचा अर्क व तीन वाट्या पाणी घालून उकळत ठेवावे. त्यात मोडाचे मूग, चवीप्रमाणे मीठ, आले व मिरपूड घालावी. सूप जरा उकळायला लागल्यावर त्यात उरलेले मक्याचे दाणे, किसलेला लाल भोपळा किंवा गाजर, चिरलेल्या कोथिंबिरीतील अर्धी कोथिंबीर, मिरची हे सर्व घालावे. पाच मिनिटे मंद आचेवर उकळावे. नंतर गॅस बंद करून उरलेली कोथिंबीर घालावी. वरून किसलेले पनीर घालावे. सकाळी नाश्त्याबरोबर एक मोठी वाटी किंवा नाश्त्याऐवजी दोन मोठ्या वाट्या हे सूप प्यायल्यास संपूर्ण सकाळ सोनेरी होऊन जाईल!टीप : यात स्वीटकॉर्नचे दाणे असल्याने वेगळे मक्याचे किंवा इतर पीठ व साखर वापरू नये. .चाकवत व कोथिंबीर ग्रीन सूपवाढपचार ते पाच कपसाहित्यदोन ते तीन कप बारीक चिरलेला चाकवत, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ हिरवी मिरची, २ चमचे कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, २ चमचे तूप, जिरे, हिंग, मीठ चवीपुरते.कृतीप्रथम तीन ते चार कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात बारीक चिरलेला चाकवत घालून पाच मिनिटे झाकण ठेवावे. तोपर्यंत पाव वाटी पाणी घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर घालून त्याची पेस्ट करावी. पाच मिनिटांनी लगेच झाकण काढून त्यात पेस्ट घालावी. आले-लसूण पेस्ट, मीठ घालून फक्त दोनच मिनिटांत गॅस बंद करावा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून शेवटी वरून तूप व जिऱ्याची फोडणी घालावी. सूप जास्त न उकळल्याने हिरवा रंग आणि व्हिटॅमिन्स टिकून राहतात. पावसाळ्यात, थंडीत जेवणापूर्वी हे सूप अतिशय उत्तम पर्याय आहे. .पम्कीन सूपवाढपचार ते पाच कपसाहित्यएक वाटी लाल भोपळ्याचा कीस, पाव वाटी मटाराचे किंवा चवळीचे दाणे, छोटा तुकडा आले, ४ ते ५ पाकळ्या लसूण, चवीनुसार मीठ, १ उभी चिरलेली मिरची, सजावटीसाठी चिजलिंग, कोथिंबीर.कृतीप्रथम तीन कप पाणी उकळत ठेवावे. त्यात भोपळ्याचा कीस, मटारचे दाणे, बारीक तुकडे करून लसूण व आले घालावे. पाच ते सात मिनिटे उकळावे. नंतर त्यात मीठ, मिरची व शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. सजावटीसठी वरून चिजलिंग घालावेत. भोपळा चवीला गोडसर असल्याने यात साखर घालण्याची आवश्यकता नाही. .स्प्राउट कोल्डड्रिंकवाढपचार ते पाच व्यक्तींसाठीसाहित्यतीन वाट्या मोड आलेली मिक्स कडधान्ये, ३-४ लसूण पाकळ्या, चवीनुसार सैंधव मीठ, १ टीस्पून चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ वाट्या ताजे ताक, १ टीस्पून साखर, थोडेसे आले (बारीक किसून), हिंग.कृतीप्रथम मोड आलेल्या कडधान्यांत तीन ते चार कप पाणी घालून ते पाच ते सात मिनिटे चांगले उकळावे. नंतर ते पाणी गाळण्याने गाळून घ्यावे. उरलेल्या कडधान्यांची आपण उसळ किंवा इतर पाककृती करू शकतो. गाळून घेतलेल्या पाण्यात चाट मसाला, सैंधव मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, ताजे ताक, साखर, आले घालून नीट मिक्स करावे. थोडावेळ फ्रिजमध्ये थंड करून प्यावे. .टोमॅटो सारसाहित्यसहा ते सात पिकलेले टोमॅटो, अर्धी वाटी खोवलेले खोबरे, मीठ, चवीनुसार साखर, २ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तूप, कढीपत्ता, जिरे, हिंग.कृतीप्रथम टोमॅटोचे तुकडे करून वाफवून घ्यावेत. ते जरा थंड झाल्यावर त्यात खोबरे घालून हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करावे. नंतर ते गाळण्याने गाळून घ्यावे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर घालून उकळावे. चांगले उकळल्यावर छोट्या कढईत तूप, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. ती सारामध्ये वरून ओतावी. सार फार वेळ उकळत न ठेवल्याने त्याचा लाल रंग टिकून राहतो.----------------