शुद्ध सोने, तूप आणि मध वापरून बालकांची रोगप्रतिकारशक्ती आणि बुद्धीवर्धन करण्यासाठी सुवर्णप्राशन.!
सुवर्णप्राशन हा आयुर्वेदात बालकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा उपाय मानला जातो. यात शुद्ध सोने, तूप आणि मध वापरून बालकांची रोगप्रतिकारशक्ती आणि बुद्धीवर्धन करण्यात येते.
सुवर्ण हे नोबल मेटल आहे म्हणजे ते कधी खराब होत नाही, त्याला गंज लागत नाही. सोन्याचा अक्षयपणा आपल्या शरीरात सामावून आपण आपले आरोग्यही अक्षय ठेवू शकू. याचसाठी कदाचित सुवर्णयोगाची कल्पना आपल्या आयुर्वेदासारख्या शास्त्रांना आली असेल.