प्रशांत कुलकर्णीशिदंची चित्रे गावाच्या, राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून जगभर गेली आणि भाषेच्याही सीमा ओलांडून त्यांनी रसिकांना ‘असीम’ आनंद दिला! .शि.द. फडणीस हे कोल्हापूरचे. (खरं म्हणजे ते कर्नाटकातील सीमा भागातील भोज या गावाचे, माझ्या गावापासून त्यांचे गाव अगदी जवळ, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना औपचारिकतेच्या सीमा आड येत नाहीत.) तर, कोल्हापूरचे शिदं मुंबईत चित्रकलेचं रीतसर शिक्षण घेऊन थोड्या काळासाठी पुण्यात आले आणि तिथेच रमले , ते जवळपास सत्तर वर्षं! अर्थात त्यावेळच्या पुण्यात कोणीही येऊन रमावं असंच ते शहर होतं .शिदंच्या सुरुवातीच्या हास्यचित्रांत शांत, सुसंस्कृत, मध्यमवर्गीय शहरातल्या जीवनाची इंप्रेशन्स स्वाभाविकपणे येत राहिली. फडणीस यांच्या पुस्तकातील त्यांची चित्रं ओळीने सावकाश बघत गेलो तर शहर, कुटुंब, नातेसंबंध, संस्कृती हे सारं कसं कसं बदलत गेलं हे आपसूकच दिसतं.रस्ते बदलले. वाहनं बदलली. घरातला स्टोव्ह गेला, गॅस आला. सायकल गेली, स्कूटर आली. नऊवारीऐवजी पाचवारी आणि नंतर पंजाबी ड्रेस, जीन्स आल्या. डोक्याचं मुंडासं, टोपी गेली आणि स्त्री-पुरुषांच्या हेअर स्टाइली आल्या, मोठे रेडिओ, ट्रांझिस्टर गेले, टीव्ही दिसू लागले. फोन गेले, मोबाईल आले. एक मजली घरं, चाळी गेल्या, अपार्टमेंट आली. समाज सर्वांगाने बदलला. बदलले नाहीत ते शि.द.फडणीस ! ते शांतपणे हे सारे बदल मनामध्ये नोंदवतात. त्यांना या सगळ्यात एक गंमत जाणवते आणि ती गंमत, ती फॅन्टसी ते गमतीशीर पद्धतीने रेखाटतात.अर्थात शिदं काही फक्त बदलच टिपत नाहीत. बदल टिपणे हे त्यांचं एक महत्त्वाचं निरीक्षण कौशल्य आहे. शिदंच्या हास्यचित्रांचा मुख्य गाभा किंवा यूएसपी ‘अद्भुतता’ किंवा ‘फॅन्टसी’ हा आहे. ही अद्भुतता पकडणं, सुचणं, रेखाटणं फार अवघड. एखादं उदाहरण घेऊनच ते समजून घ्यावं लागेल.बॅडमिंटन खेळण्यासाठी निघालेली युवती आणि सुतार कामासाठी निघालेल्या बापईगड्याच्या सायकलींची भर बाजारात झालेली टक्कर, हे चित्र पाहा. लेडीज सायकल वरून वेणी उडवत जाणारी, स्लीव्हलेस ब्लाऊज घालणारी, स्मार्ट, आकर्षक चेहऱ्याची, मध्यमवर्गीय कॉलेज तरुणी.तिच्या चेहऱ्यावरचे ते ‘अगं बाई’चे भाव, मोठे डोळे (पपा ओरडतील नं आता! अशी भीती त्यात आहे ), नाजूक टिकली आणि कापली गेलेली रॅकेट... आणि ‘काय झालं म्हायतीच न्हायी बघा’ अशा तोऱ्यात निर्विकारपणे निघून चाललेला धोतर, मुंडासेवाला सुतारबाबा, त्याची सायकल, सुतार कामाचं कॅरियरला लावलेलं इतर साहित्य आणि एखाद्या खलनायिकेसारखी वागलेली लांबलचक करवत!! या साऱ्यावरून आपली नजर झरझर फिरते. त्या तरुणीच्या पायातले पांढरे स्पोर्ट शूज आणि सुतारबाबाच्या कानावरची पेन्सिल हे तपशील निसटू शकतात. पण ते महत्त्वाचे आहेत, कारण त्यातून दोन्ही व्यक्तिरेखा ठळक होतात. .एकूण चित्र पाहिल्यावर हमखास हसू हे येणारच. पण मुद्दा आहे फॅन्टसीचा. मुळात ही अशी कल्पना सुचणंच फार अतर्क्य आहे. कारण हा प्रसंग प्रत्यक्षात घडू शकणारा नाही. पण फडणीस यांचं हेच तर बलस्थान आहे. आकर्षक रंगसंगती, निळ्या किंवा पिवळ्या रंगात सूचकपणे रेखाटलेली पार्श्वभूमी, म्हणजे प्रसंग नेमका कुठे घडतोय याची वाचकाला साधारण कल्पना यावी इतपतच. मुख्य पात्र ठसठशीत, गोंडस, चेहऱ्यावर शक्यतो निरागस भाव, मध्यमवर्गीयांच्या आजूबाजूला असणारे विषय, अभावितपणे घडणारे विनोदी प्रसंग आणि एखादी अद्भुत कल्पना!!फडणीस यांची अशी शेकडो हास्यचित्रं अनेक दिवाळी अंकांच्या, मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आणि १९५२च्या सुमारास सुरू झालेल्या या फॅन्टसीने मराठी मनावर गारुड केलं ते फडणीस आता वयाच्या शंभरीत प्रवेश करताहेत तरी आजही उतरलेलं नाही!फडणीस यांनी केवळ मासिकांची मुखपृष्ठं केली नाहीत तर चित्रकलेच्या अनेक प्रकारात त्यांनी यशस्वीरित्या काम केलं. स्वतःचा ठसा उमटवला आणि शक्य तिथे विनोदाला सोबत घेऊन गेले. मग ते जाहिरात क्षेत्र असो, पुस्तकाच्या आतील रेखाटनं असोत, पुस्तकांची मुखपृष्ठ असोत वा चक्क गणिताची पुस्तकं!विनोदी लेखक आणि व्यंगचित्रकार हे एकत्र येतात तेव्हा भलतीच बहार उडवून देतात. शब्दांमधून तडतड उडणारे विनोद आणि जोडीला रेषेच्या नजाकतीच्या उमटणाऱ्या हास्य-ताना यामुळे वाचक या अप्रतिम जुगलबंदीचा साक्षीदार होतो.अपूर्वाई आणि पूर्वरंग ही पु.ल. देशपांडे यांची प्रवास वर्णनाची दोन पुस्तकं. शिदंनी यात उत्तम रेखाटनं केली आहेत. (पुलंनी फडणीसांना चतुर चित्रकार असं म्हटलं आहे ). ही प्रवासवर्णनं वाचताना पुलं आपल्याला काहीतरी सांगताहेत आणि शिदं काहीतरी दाखवताहेत ही भावना सतत सोबत असते आणि आपला वाचन प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी होतो.फ्रान्समधल्या एकूण जीवनपद्धती आणि जेवणपद्धतीची रसभरीत आणि सुग्रास वर्णनं पुलंनी केली आहेत. तिथले वेटर्स चालत नाहीत तर तरंगतात असा उल्लेख त्यात आहे. फ्रेंच भोजनाचे वर्णन करताना त्यांनी तिथले मासे आणि पाक कौशल्याचे सविस्तर वर्णन केलं आहे.हे सगळं वाचताना मधेच आपण शिदंच्या तरंगणाऱ्या वेटरचे चित्र पाहतो. मजकूर वाचतो आणि पुन्हा चित्र पाहतो. मासा, वाइन पटकन नजरेला दिसतात. थोड्या अवकाशाने वेटरच्या चेहऱ्यावरचे मंद स्मित दिसतं आणि पुलंनी वर्णन केलेल्या भोजन समारंभात शिदं आपल्याला प्रत्यक्ष तिथे घेऊन जाताहेत असं वाटतं.इंग्लंडबद्दलही पुलंनी सविस्तर लिहिलं आहे. निसर्ग, माणसं, समाज, संस्कृती, भाषा याबद्दल त्यांनी फार सुंदर, नेमकेपणाने लिहिलं आहे. त्यांच्या निरीक्षण शक्तीला आणि त्यातून त्यांच्या विनोदी, खुसखुशीत अभिप्रायाला आपण आपसूकच दाद देतो. धर्म, न्याय, संस्कृती, क्रिकेट वगैरेबद्दल लिहिताना पुलं इंग्रजांच्या स्वभावाचा पत्ताच लागत नाही, असं म्हणतात.चर्च, पब, पब्लिक स्कूल, थिएटर, क्रिकेट अशा भिन्न गोष्टी त्यांना आढळल्या. इंग्रजांची व्यापारी वृत्ती, कपड्यांबाबतचा शिष्टाचार याकडेही पुलं लक्ष वेधतात. पण शिदं इंग्रज माणसाच्या या साऱ्या वर्णनाचं कॉन्सन्ट्रेशन करून नेमकं अर्कचित्र रेखाटतात. ही शिदंची ताकद आहे! पुलंचा मजकूर सावकाशीने चघळत वाचायचा असतो तद्वत शिदंची ही चित्रंही सावकाशीने घुटक्या, घुटक्याने पाहायची असतात, तर त्याची मजा येते..प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी गणिताचे पुस्तक तयार करणे हे त्यांना सर्वात मोठं आव्हान वाटलं होतं. हे त्यांचं काम अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं पाहिजे. कारण साधं, सोपं गणित समजून सांगण्यासाठी साधी, सोपी चित्र काढणं हे अवघड, क्लिष्ट आणि जबाबदारीचं काम होतं.त्यांच्या रेषाटन -आठवणींचा प्रवास (ज्योत्स्ना प्रकाशन ) या पुस्तकातील ‘सचित्र गणित’ हे प्रकरण मुळातूनच वाचण्यासारखं आहे. एका बाजूला निर्मितिक्षम कलावंत आणि दुसऱ्या बाजूला सरकारी अजस्र यंत्रणा अशा या द्वंद्वयुद्धातून अखेरीस कोट्यवधी विद्यार्थी जिंकले, हे महत्त्वाचं.दोन वर्षाच्या चाचणीनंतर जेव्हा हे पुस्तक शाळांमध्ये लागलं तेव्हा ‘अखेरीस मी पहिलीची परीक्षा उत्तीर्ण झालो’, असे मिस्कील उद्गार त्यांनी काढले.शिदंनी शेकडो पुस्तकांची मुखपृष्ठं केली. त्यातील ना.सी. फडके, सावरकर आदी लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठं गंभीर आशय सांगणारी होती. गो. नि. दांडेकर यांच्या पूर्णामायची लेकरं या कादंबरीसाठी त्यांनी केलेली रेखाटनं जबरदस्त आहेत. ती सर्व वास्तववादी शैलीतील आहेत.लेखिका शकुन्तला फडणीस या शिदंच्या केवळ सहचारिणीच नव्हत्या तर त्यांच्या अनेक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. नर्मविनोदी शैलीतील त्यांच्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं अर्थातच शिदंनी केली आहेत. ‘चित्रहास’ हा व्यंगचित्र विषयक कार्यक्रम दोघे मिळून सादर करत असत. हे परस्परपूरक नातं काही विलक्षणच!आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या मुखपृष्ठांचं प्रदर्शन भरवावं, असं एकदा त्यांनी मनावर घेतलं आणि मग शिदं स्वतः इंजिनिअर, तंत्रज्ञ आणि प्रदर्शन रचनाकार झाले. प्रदर्शन कुठेही भरवलं तरी ते सुटसुटीतपणे नेता यावं, मांडता यावं अशी त्याची रचना त्यांनी स्वतः केली.जहांगीरमध्ये १९६५ साली अक्षरशः हजारो प्रेक्षक त्यांच्या प्रदर्शनाला तिकीट काढून आले. हे यश अभूतपूर्व होतं. त्यानंतर अर्थातच देशात, परदेशात ‘हसरी गॅलरी’ची अनेक प्रदर्शनं झाली. लाखो लोकांनी हे प्रदर्शन रांगा लावून पुन्हा पुन्हा पाहिलं. भारतीय व्यंगचित्रकाराना अत्यंत अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे.या ‘हसरी गॅलरी’ प्रदर्शनात त्यांचा खास शिदं टच दिसतो. त्यांची क्रिएटिव्हिटी अर्थातच व्यंगचित्रात आहेच, तशी ती प्रदर्शन उभं करण्यात आणि मांडणीतही दिसते. पैलवानाचे एकच चित्र काढून त्याच्या समोर आरसा ठेवून दोन (एकसारख्या!) पैलवानांची कुस्ती दाखवणं असो वा पुतळ्याचे दात घासताना खरा टूथ ब्रश वापरणं आणि तो (मोटरच्या साहाय्याने) मागे, पुढे हलवणं अशा अनेक मजेशीर चमत्कृती ते करतात.तर, असे हे अद्भुत शि.द. फडणीस! शिदं सीमा भागातील असले, तरी त्यांची चित्रे मात्र गावाच्या, राज्याच्या नव्हे तर देशाच्या सीमा ओलांडून जगभर गेली आणि भाषेच्याही सीमा ओलांडून त्यांनी रसिकांना ‘असीम’ आनंद दिला!(प्रशांत कुलकर्णी व्यंगचित्रकार आणि व्यंगचित्रकलेचे अभ्यासक आहेत.)--------------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.