नेहा वसगडेकर, फूडपॉइंट
वाढप: १५-१८ लहान मोदक
साहित्य: एक वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी खारीक पावडर, पाव वाटी गूळ पावडर, वेलची पूड, १०-१२ बदाम, २ छोटे चमचे तूप.
कृती:
सर्वप्रथम मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, गूळ, खारीक पावडर, बदाम आणि वेलची पूड घालून बारीक करून घ्यावे. नंतर एका बाऊलमध्ये हे सर्व मिश्रण घेऊन त्यामधे थोडेसे तूप घालावे आणि छान गोळा करून घ्यावा.
गूळ जर चिकट असेल तर तुपाचा फक्त हात लावावा, जास्ती तूप घालू नये. मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून सर्व मोदक करून घ्यावेत. गणपती बाप्पासाठी आपले पौष्टिक मोदक तयार.