नेहा लिमये
आपले संगीत एकस्तरीय नसून अनेकस्तरीय आहे, त्यामुळे त्याला वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये बंदिस्त न करता मोकळं सोडून द्यावं, वाहू द्यावं. मला वाटतं, आजच्या संगीतकारांची वाटचाल याच दिशेनं सुरू आहे. जागतिक संगीत सिनेमात आणणं आणि त्याचवेळी आपलं रागसंगीतही तरुणाई सहज गुणगुणेल अशा पद्धतीनं सिनेमातून सादर करणं ही दुहेरी करामत साधणं सोपं नाही.