किशोर पेटकर
२०२३-२०२४मध्ये भारताचा हॉकीत दबदबा दिसून येत आहे. हांग चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले, गतवर्षी व यंदा आशियाई चँपियन्स ट्रॉफी पटकावली. ऑलिंपिक ब्राँझपदकाचीही कमाई केली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिकनंतर पॅरिस ऑलिंपिकमध्येही ब्राँझपदक जिंकले. आणि आता भारतीय हॉकी संघाने सहा देशांची आशियाई चँपियन्स ट्रॉफी जिंकताना आपला राष्ट्रीय खेळ असलेला हॉकी गतवैभवाच्या दिशेने झुकत आहे, हे दाखवून दिले.