उमाशशी भालेराव
दिवाळीचा सण जवळ येताच गृहिणींची लगबग सुरू होते. लाडू, करंजी, चिरोटे, शेव, चिवडा, चकली असे फराळाचे पदार्थ केले जातात. मुख्य सणाचे चार-पाच दिवस मात्र जेवणात वेगवेगळी पक्वान्ने हवीतच! नाही का? त्यासाठी नेहमीचे पुरणपोळी, गुळपोळी, बासुंदी हे पदार्थ आहेतच. आज काही नवीन, वेगळे पदार्थ पाहूयात..
साहित्य
दोन लिटर दूध, साखर, उपलब्ध असतील ती सर्व प्रकारची फळे (संत्री, मोसंबी, सीताफळे, सफरचंद, चिकू, अननस, पेअर वगैरे.)