जोपर्यंत नोकरी करणाऱ्याला आईला वडील आदर देत नाहीत, आपल्या बरोबरीने वागवत नाहीत तोपर्यंत पुढच्या पिढ्यांना हे समजणारही नाही. घरासाठी आई आणि वडील हे दोघेही बरोबरीने काम करतात हे मुलांना लहानपणापासूनच समजलं पाहिजे.
आपल्या वडिलांइतकीच आईची नोकरीही महत्त्वाची आहे हे त्यांना जेव्हा समजेल तेव्हाच मोठे झाल्यावर त्यांच्या पत्नीच्या नोकरीचा/ करिअरचाही आदर करतील. मुलाची फी, घरातले महत्त्वाचे खर्च आणि घरातली कामं ही दोघांची जबाबदारी आहे हे आपणच मुलांना आपल्या वागणुकीतून सांगायला हवं तरंच कोणत्याही महिलेची नोकरी ‘नाइलाज’ म्हणून स्वीकारली जाणार नाही.