Offbeat Tour : स्वतःच्या कारने फिरण्याचा भारतातला ऑफबीट ट्रेंड!

ऑफ-बिट ठिकाणांना जाणीवपूर्वक एक्सप्लोर करण्याचा ट्रेंडही आहे.
Offbeat Destinatio
Offbeat Destinatioesakal
Updated on

सागर गिरमे

आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे ते मनमुराद जगले पाहिजे, हे कोरोनाच्या साथीने आपल्याला शिकवले. त्यानंतर जगण्याच्या व्याख्याच बदलल्या.

अधिकाधिक आनंद मिळविण्यासाठी अत्यंत सुरक्षित, गर्दी टाळून पर्यटन करण्याचा ओघ वाढला अन् त्यातूनच कार पर्यटनाचा ट्रेंड आता भारतातही सेट होऊ पाहात आहे.

काही वर्षांपूर्वी कोरोना पसरला आणि सगळे जगच बदलून गेले. जगण्याच्या परिभाषाच बदलल्या, काही अगदी आक्रसल्या, तर काही विस्तारल्या.

‘जान है तो जहान है..’ अशी सर्वांचीच मानसिकता झाली. पुढे काय होईल, हे सांगता न येणे कोरोनाच्या साथीनंतर खूप गांभीर्याने घेतले गेले.

त्याचा एक परिणाम म्हणून पर्यटनाचा प्राधान्यक्रमही बदलला. आधीच्या बकेट लिस्टमध्ये वेळ मिळेल तेव्हा किंवा शक्यतो रिटायरमेंटनंतर पर्यटनाचा नंबर लागायचा. पण हे चित्र सध्या बदलेले आहे.

मौजमजा करत, मनाला शांती, आनंद आणि समाधान देत जगण्याचे धोरण अवलंबल्याने पर्यटनामध्ये वाढच झालेली आहे. त्यातही गर्दी टाळून स्वतःच्या कारने फिरण्याचा ट्रेंड आता भारतात आलेला आहे.

समृद्धी महामार्ग, यमुना एक्सप्रेस वेसारखे सलग मोठे, रिकामे असलेले रस्ते, त्यावर मिळणाऱ्या इतर सुविधा यामुळे कार घेऊन पर्यटन करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये गेल्या वर्षी (२०२३मध्ये) ४० टक्क्यांनी वाढ झाली.

सार्वजनिक वाहनांच्या वापराच्या तुलनेत ही वाढ लक्षणीयच म्हणता येईल. पर्यटन करताना कम्फर्ट खूप महत्त्वाचा आहे, मस्त पाय लांब करून, आरामात बसून, पाहिजे तेव्हा पाहिजे ते करण्याचा आनंद केवळ स्वतःच्या गाडीतच मिळवता येतो.

त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यटन करायचे असेल तर स्वतःची गाडीच हवी, त्याशिवाय कम्फर्ट मिळूच शकत नाही, असे अनेक पर्यटकांचे म्हणणे आहे.

Offbeat Destinatio
Sakal Tourism Expo 2024 : देशातील पर्यटनस्थळांना भेट देण्याची अनोखी संधी

टेक इंटिग्रेशन

एआय टेक्नॉलॉजीमध्ये अत्यंत वेगाने डेव्हलपमेंट होत असल्याने पर्यटनामध्ये कार चालविणाऱ्यांसाठी एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

अॅडव्हान्स नॅव्हिगेशन सिस्टीम, रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट आणि प्रवाशांच्या गरजा पूर्ण करणारे स्मार्ट अॅप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर डाऊनलोड होऊन, त्याचा वापर केला जात आहे.

ट्रॅव्हल अॅपमध्ये एआय आणि मशिन लर्निंगच्या एकत्रीकरणामुळे एकूण प्रवासाचा अनुभव लक्षणीयरित्या आनंदादायी झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे आता अगदी घरातून निघण्याआधी ट्रॅव्हल गाइडशिवाय आपली आयटिनररीही तयार असते.

त्यामुळे ठरलेल्या वेळेत हव्या त्या गोष्टी नेमक्या पद्धतीने करता येतात. आपल्या देशातील जवळपास ७० टक्के कार पर्यटक मार्गांचे नियोजन करण्यासाठी, आवडीची ठिकाणे आणि तेथील प्रसिद्ध असलेली स्थळे शोधण्यासाठी पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या नॅव्हिगेशन अॅपचा वापर करतात.

योग्य वेळी मिळणाऱ्या अपडेटमुळे परिस्थितीनुसार निर्णय बदलण्याचे स्वातंत्र्यही त्यामुळे पर्यटकांना मिळत आहे.

खाद्यपर्यटन

कार पर्यटनातील सर्वाधिक लोकप्रिय असणारे पर्यटन म्हणजे खाद्यपर्यटन किंवा खाद्यभ्रमंती. ह्या भ्रमंतीसाठी फक्त कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहणे जवळजवळ अशक्यच आहे.

स्वतःची कार असेल तर ही भ्रमंती अधिक सुखकारक होते. त्याचाच परिणाम म्हणून प्रसिद्ध खाद्यठिकाणांना केंद्रस्थानी ठेवून सरासरी ६० टक्के पर्यटनाचे नियोजन करण्यात येत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

आपल्या देशांमध्ये खाद्यसंस्कृती गावनिहाय बदलत असते. त्यामुळेच त्यामध्ये मोठी वैविध्यता आहे. अगदी स्ट्रीट फूडपासून उत्तम आणि मोठमोठ्या हॉटेलांपर्यंत ही विविधता आपल्याला दिसून येते.

कार पर्यटनाच्या माध्यमातून हे सहज शक्य होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोहोचू शकलेली नाही अशा ठिकाणीही जाणे आपल्या वाहनांमुळे सहज शक्य होत आहे.

इकोफ्रेंडलीला महत्त्व

पर्यावरणाविषयीची जागरूकता वाढत आहे, तसे कार पर्यटनही इकोफ्रेंडली होण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. त्यामुळे पर्यावरणासाठी अनुकूल पर्यायही शोधले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची रेंज आता पूर्वीपेक्षा वाढलेली आहे.

त्यामुळे कार पर्यटनाचा छंद असलेले पर्यटक आता ईव्हीकडे किंवा हायब्रीड वाहनांकडे वळत आहेत. त्यामुळे इंधनामुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच परिसरात कचरा होऊ नये, म्हणूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत.

या प्रकारे स्वतःमध्ये बदल केल्याने, जागरूकता निर्माण झाल्याने गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार ३० टक्के कार पर्यटकांकडून प्रदूषण आणि कचरा रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आलेले आहे.

Offbeat Destinatio
Laptop Charger for Car : कारमध्ये लॅपटॉप कसा करायचा चार्ज? 'हे' गॅजेट्स येतील कामी; जाणून घ्या

ऑफ-बीट पर्यटनामध्ये वाढ

खासगी कार पर्यटनामुळे देशातील विविध भागांमध्ये असणाऱ्या पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्यांची आणि भेटींचीही संख्या वाढत आहे.

नेहमीच्या पर्यटन स्थळी पर्यटक जातातच. त्यासोबतच अनेक ऑफ-बिट ठिकाणांना जाणीवपूर्वक एक्सप्लोर करण्याचा ट्रेंडही आहे. त्यामुळे त्या त्या परिसरात पर्यटनवाढीसोबतच स्थानिक रोजगारातही वाढ झालेली आहे.

कार पर्यटन हा पर्यटकांसाठी कन्फर्टेबल ऑप्शन आहे, मात्र तरीही त्यासाठी कारमध्ये काही आवश्यक बदल करून घेणे किंवा त्याला अॅक्सेसरीची जोड देणे आवश्यक आहे.

ऑल टेरेन टायर : कार पर्यटन लांबवरचे आणि कोणत्याही भौगोलिक स्थितीतील असू शकते. त्यासाठी वाहनाची स्थिती योग्य असणे आवश्यक आहेच, त्यासोबतच वाहनाचे टायरही सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

त्यासाठी सर्व भौगोलिक परिस्थितींमध्ये योग्य पद्धतीने चालणारे ऑल टेरेन टायर लॉंग टूरच्या आधी आपल्या कारला बसवून घेणे श्रेयस्कर ठरते. त्यामुळे डांबरी, सिमेंटच्या रस्त्यापासून ते अगदी ऑफरोड असलेल्या कोणत्याही भागांमध्ये गाडीला चांगली आणि सुरक्षित ग्रीप मिळते.

इंजिन गार्ड : जमिनीला किंवा एखाद्या दगडावर खालच्या बाजूने घासल्यामुळे गाडीचे इंजिन नादुरूस्त होण्याच्या प्रसंगाला अनेकदा अनेकांना सामोरे जावे लागते. निर्मनुष्य ठिकाणी किंवा जंगली भागात अशा पद्धतीने गाडी बंद पडणे नक्कीच चांगले नाही.

त्यामुळे आपल्या पर्यटन-मार्गात कोणत्या प्रकारचे रस्ते आहेत याची आधीच माहिती घेऊन प्रवासाआधी गाडीला इंजिन गार्ड बसवून घ्यायला हवे. मजबूत पण वजनाने हलके असलेल्या मटेरियलपासून हे गार्ड बनविण्यात येते.

Offbeat Destinatio
Winter Car Tips : हिवाळ्यात कार चालवताना हीटर वापरल्यामुळे किती कमी होतं मायलेज? जाणून घ्या

रूफ टॉप कार्गो : लांबच्या प्रवासात गाडीत जागा असेल तरच अगदी आरामात प्रवास करता येतो. तसे नसल्यास अंग आखडून बसून प्रवासाची मजा उपभोगण्याऐवजी प्रवासाचा कंटाळा येतो.

त्यामुळे गाडीमध्ये जास्तीत जास्त जागा उपलब्ध होण्यासाठी आपल्यासोबत असलेल्या सामानाला स्वतंत्र जागी ठेवणे आवश्यक आहे.

पण प्रवासामध्ये सामान चोरीला जाण्याचा धोका खूप मोठा आहे. त्यावर मात करण्यासाठी रूफ टॉप कार्गो महत्त्वाची भूमिका पार पाडतो. यामुळे गाडीत जागा होतेच, सोबतच सामान सुरक्षितही राहते.

स्मार्ट डॅश-कॅम : लांबच्या प्रवासादरम्यान गाडीमध्ये डॅश-कॅम असणे आवश्यक आहे. सध्या कुठेही जा व्हिडिओ करण्याचा ट्रेंड आहे. त्यावेळी गाडीतून रस्त्याचे आणि गाडीतील शॉट घेण्यासाठी हा कॅमेरा उपयुक्त ठरतो.

पण हा त्याचा मूळ उद्देश नाही. अनोळखी प्रदेशात एखादी अनुचित घटना घडल्यास ती त्यामध्ये रेकॉर्ड व्हावी, जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने पुरावा म्हणून हे शूट उपयोगाला येऊ शकते.

लक्षात ठेवा

  • कारची नियमित देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. प्रवासाच्या आधी गाडी अॅथोराईज्ड सर्व्हिस सेंटरमधूनच तपासून घ्या.

  • सर्व प्रकारच्या वातावरणात उपयुक्त ठरेल असे सामान स्वतःसोबत ठेवा. लांबच्या प्रवासात कधीही वातावरण बदलू शकते.

  • स्थानिक परंपरा, प्रथा, भाषा आणि तेथील लोकांचा आदर करा. त्यासोबतच वाहतुकीचे नियम पाळायला अजिबात विसरू नका.

-----------------

Offbeat Destinatio
Maldives Tourism Market : 'बॉयकॉट ट्रेंड'चा मालदीव पर्यटनाला किती फटका बसला? आकडेवारी आली समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()