आकाशाच्या निळ्या रंगाच्या आणि पानांच्या हिरव्या रंगाच्या किती वेगवेगळ्या छटा आहेत. या निसर्गातच इतक्या वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे जीवजंतू, पशू-पक्षी आणि झाडं-झुडपं आहेत, की निसर्गाच्या या कलाकृतींना मनापासून न्याहाळताना किती दाद देऊ आणि किती नको असं होऊन जाईल.
फक्त हे सगळं जाणून घेऊन या सर्वांचा आस्वाद घेणारं उत्सुक कलासक्त मन तुमच्याकडं असायला हवं. अशी मानसिकता तुमच्यामध्ये निर्माण करण्याचा छोटासा खारीचा वाटा म्हणजे कलानुभव हे पाक्षिक सदर.