सर्वात वाईट शक्यता म्हणजे पश्चिम आशियात युद्ध भडकणे. त्यातून जर सुवेझ कालव्यातून होणारी वाहतूक थंडावली तर जागतिक पुरवठा साखळीत मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. तसे झालेच तर ती एक मोठी ब्लॅक स्वान घटना होईल. त्यावरच बेतलेली अफवा (ती म्हणजे निफ्टी १८००० होणार) सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. तसे झाल्यास ती एक खरेदीची मोठी संधी असेल.