मनीषा दीक्षितव्हेनिसच्या प्रसिद्ध कालव्यांमधून फिरण्यासाठी आम्ही गोंडोला राइड घेतली, तेव्हा माझ्या मनात एक चित्र तयार होतं... आपण गोंडोलात बसून कालव्यातून फिरतोय... नावाडी इटालियन भाषेत कुठलं तरी गाणं म्हणतोय... काय अर्थ असेल या गाण्याचा...? .शाळेत असताना व्हेनिसला कालव्यांचं शहर म्हणतात हे माहीत झालं होतं... आणि मज्जा वाटली होती, कसं असेल ना हे शहर! बोटीतून शाळेला जायचं, बोटीतूनच कुणाच्या घरी जायचं-यायचं... त्याच कल्पनेतल्या व्हेनिसला आपण आता प्रत्यक्ष भेट देणार......बस धावत होती. जाताना व्हेरोना गाव लागलं. इथं थांबलो नाही. पण हे गाव रोमिओ-ज्युलिएटमुळे प्रसिद्ध झालं असं आमच्या टूर मॅनेजरनं सांगितलं. बस पडोवा (Padova) बंदरापर्यंत जाणार होती व तेथून ॲड्रिॲटिक समुद्रातून आम्ही व्हेनिस बेटांवर जाणार होतो. पडोवामध्येच आमचा मुक्काम होता.तिरोल (Tyrol) प्रदेशातून बस धावत होती. डोंगराळ प्रदेश... त्याचंही एक वेगळंच सौंदर्य... ही सृष्टी ज्यानं निर्माण केली तो किती अजब कारागीर असला पाहिजे. डोंगरासारखे डोंगर, पण तेही किती प्रकारचे... पण आपल्या हिमालयाला खरोखरच तोड नाही, असंही वाटून गेलंच.मायकलअँजेलोच्या नजरेतून, म्हणजेच त्याने तयार केलेली डिझाईन बघून इटलीची निर्मिती झाली, असं मार्क ट्वेननं म्हणून ठेवलंय. मायकेलअँजेलो हा इटलीचा मूर्तिकार, चित्रकार, कवी, स्थापत्यविशारद. रेनेसॉन्सची सुरुवात इटलीमधूनच सुरू झाली असे म्हणतात. अनेक विचारवंत, कलावंत यांची जन्मभूमी म्हणजे इटली. लिओनार्डो दा व्हिंची इथलाच. रेडिओ ट्रान्समिशनचा शोध लावणारा मॅर्कोनीही इथलाच. जगाला ऑपेराची भेट इटलीनंच दिलीय. पियानो, व्हायोलिन इटलीमध्येच पहिल्यांदा निर्माण झाली. फेरारी कार इटलीचीच. अशी ही सांस्कृतिक वारसा लाभलेली इटली काही दिवसांच्या भेटीत कशी बघून होईल. असं म्हणतात, की तुम्ही वीस वर्षं जरी इटलीत राहिलात, तरी ती बघून होत नाही! व्हेनिस हे याच इटलीतलंच शहर. .पडोवापासून वॉटर बसनं आम्ही व्हेनिस बेटांवर पोहोचलो. खूप गर्दी होती. काही ठिकाणी विक्रीसाठी पथाऱ्या मांडलेल्या होत्या. इटालियन भाषेत व्हेनिसला व्हेनेशिया असं म्हणतात. रोमन साम्राज्याच्या राजधानीचं हे शहर. व्हेनिस ११७ लहान बेटांचं मिळून झालेलं आहे, आणि ही बेटं १७७ कालवे व ४०९ पुलांनी एकमेकांना जोडली गेली आहेत, गाइड सांगत होता. हॉलिवूडमधील अनेक सिनेमांतील प्रसंगांचं चित्रण इथं झालेलं आहे. क्लिओपात्रा या प्रसिद्ध सिनेमाचं चित्रणही इथं झालं होतं. व्हेनिसला लागूनच मेस्त्रे सिटी आहे. नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत व्हेनिस शहर विकसित होत होतं अशी माहिती गाइडनं दिली. इथला ग्रॅंड कॅनॉल एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा आहे. पण व्हेनिस आता थोडं थोडं पाण्यात खचत चाललंय.नेपोलियन बोनापार्टनं १७९७मध्ये व्हेनिस जिंकून घेतलं होतं, असं इतिहास सांगतो. व्हेनिस बघताना मी माझा चष्मा बदलून इतिहासाचं चित्र रंगवणारा चष्मा घातला, तेव्हा हे कालव्यांचं शहर कसं तयार झालं असेल या कल्पनेनं अचंबित व्हायला झालं. व्हेनिसमध्ये आम्ही पंख असलेल्या सिंहाच्या मूर्ती पाहिल्या. त्याप्रमाणे पाचशे वर्षांपूर्वी तयार केलेलं सोन्याचं घड्याळही बघितलं. सिटी टूरमध्ये ब्रीज ऑफ साय (Bridge of Sighs) दाखवला. सन १६००मध्ये बांधलेला हा बंदिस्त पूल पांढऱ्या चुनखडीचा आहे. हा पूल डोग्ज पॅलेस आणि नवीन तुरुंग यांना जोडतो. त्याला खिडक्या व सळया बसवलेल्या आहेत. डोग्ज पॅलेस (Doge’s palace) हे डोग ऑफ व्हेनिसचं (नगरप्रमुख) राहण्याचं ठिकाण होतं. आता तिथं संग्रहालय आहे. या वास्तूचं बांधकाम व्हेनेशियन गॉथिक पद्धतीचं आहे.येथील सेंट मार्क्स स्क्वेअर हा जगातील सर्वात सुंदर चौक आहे असं म्हटलं जातं. सेंट मार्क्स हे तत्त्ववेत्ते व पोप होते. .सेंट मार्क्स स्क्वेअर इथं सेंट मार्क्स बॅसिलिका हे रोमन कॅथलिक चर्च व बेल टॉवर आहे. या टॉवरची उंची ९८.६ मीटर आहे. सेंट मार्क्स स्क्वेअरच्या एका कोपऱ्यात हा बेल टॉवर आहे. त्यात पाच घंटा बसवण्यात आल्या आहेत. जवळजवळ ९०० वर्षांपूर्वी एकेक तुकडे जोडून हा टॉवर बांधला आहे. टॉवरवर मोठे घड्याळ व एक प्रचंड घंटा आहे. जुन्या काळी ही घंटा वाजवून वेगवेगळे संदेश दिले जात.पारदर्शक काचेचं व तिच्या नजाकतीचं काही वेगळंच सौंदर्य असतं, हे काचेच्या कारखान्यात गेल्यावरच कळलं. हे सौंदर्य तसं वर्णन करूनही नाही सांगता येत. काच वितळवून त्यापासून वस्तू कशा तयार होतात याचं प्रात्यक्षिक आम्हाला मोरॅनो येथील ग्लास ब्लोईंग फॅक्टरीत पाहायला मिळालं. काच वितळवून त्याचा फुगा करून अत्यंत कौशल्यानं त्यापासून कलात्मक वस्तू कशा तयार होतात हे तिथं आम्हाला दाखवलं. ९०० वर्षांपासून इथं अशा पद्धतीनं काचेच्या वस्तू तयार केल्या जातात म्हणे. फॅक्टरीच्या बाहेरील दुकानातल्या तऱ्हतऱ्हेच्या वस्तू बघून आपण अवाक होतो... छे! त्यांना वस्तू म्हणणं चुकीचंच. ती एकेक कलाकृती होती...!व्हेनिसच्या प्रसिद्ध कालव्यांमधून फिरण्यासाठी आम्ही गोंडोला राइड घेतली, तेव्हा माझ्या मनात एक चित्र तयार होतं... आपण गोंडोलात बसून कालव्यातून फिरतोय... नावाडी इटालियन भाषेत कुठलं तरी गाणं म्हणतोय... काय अर्थ असेल या गाण्याचा; मनात विचार येईल... भूगोलाच्या तासाला व्हेनिसबद्दल शिकले तेव्हापासूनचं मनातलं हे चित्र! प्रत्यक्षात प्रवास शांतपणे चालू होता... वल्ही मारली जात होती... चष्म्याच्या काचा ओल्या झाल्या होत्या... बाजूच्या इमारती खूप जुन्या झाल्या होत्या, खचत चालल्या होत्या. खिडक्यांतून फुलझाडं लावलेली दिसत होती. कॅनॉलमधल्या पाण्याला दुर्गंधी येत होती, त्यामुळे प्रवासी नाकावर रुमाल धरत होते... आणि तरीही मनातल्या मनात या नगरीचं वेगळंच चित्र रंगवताना मला हे काहीही जाणवत नव्हतं! नगरीही वृद्ध होते... तिचेही अवयव ढासळतात... म्हणून असेल कदाचित!व्हेनिसमध्ये हिंडताना गाइडनं आम्हाला इटलीबद्दल बरीच माहिती दिली. या रोमन एम्पायरच्या राजधानीकरिता वेगवेगळ्या देशातून युद्धात लुटून आणलेलं संगमरवर वापरण्यात आलेले होतं, असं गाइडनं सांगितलं.फॅशन, लेदरच्या वस्तू, परफ्युम यासाठी प्रसिद्ध असलेलं इटली पर्यटकांचंही आवडतं डेस्टिनेशन आहे.--------------------.जनुकामध्ये बदल होऊन नवं वाण तयार होण्याची प्रक्रिया आहे तरी कशी? जाणून घ्या जनुकीय वारशाच्या विज्ञान कथा .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.