सुरेश वांदिले
आयटीआयमधील विद्यार्थी तंत्रकुशलतेने परिपूर्ण होत असल्याचे निदर्शनास आल्याने बऱ्याच शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना स्थानिक औद्योगिक घटकांमध्ये सुलभतेने सामावून घेतले जाते. प्रारंभी अर्धकुशल कामगार म्हणून संधी मिळाल्यावर, संस्थांतर्गत कुशल कामगारांकडून मिळणारे प्रशिक्षण/ सराव आणि अनुभवानंतर त्यास कुशल कामगाराचा दर्जा व संधी दिली जाते.