आधुनिक ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे जनक बॅरन पिअर डी कुबर्टिन नेहमी म्हणत असतात, की ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवण्यापेक्षाही सहभाग घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण हा पृथ्वीवरील असा सोहळा आहे, की ज्यामध्ये जात, धर्म, भाषा, रंग, वर्ण यांना भेदून खेळाडू सहभागी होत असतात आणि आपले कौशल्य दाखवत असतात.
ऑलिंपिकपटू घडविण्यात खेळाडूंच्या आई-वडिलांचा मोठा वाटा असतो. ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या नेमबाज अंजली वेदपाठक-भागवत, राही सरनोबत व बॅडमिंटनपटू निखिल कानेटकर यांचा ऑलिंपिकपर्यंतचा अभिमानास्पद प्रवास त्यांच्या आई-वडिलांच्या नजरेतून...