Millet : ज्वारी आणि नाचणीत 'एवढी' पोषणमूल्य!!

jowar bhakri
jowar bhakriesakal
Updated on

ज्वारी

पोषण मूल्ये - प्रथिने - १०.४ टक्के, कर्बोदके - ७२.६ टक्के, स्निग्ध पदार्थ - १.९ टक्के, खनिजे - १.६ टक्के.

ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजद्रव्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ज्वारीची भाकरी पचण्यास अतिशय हलकी आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा ज्वारीची भाकरी आहारात असावी.

ज्वारीमध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळते. ती ऊर्जा दिवसभर कामी येते. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्याने आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते.

jowar bhakri
Millet Food: बाजरीची बिस्किटे, बाजरीचा हलवा, झुणका-भाकरीचा थेट परदेशप्रवास..!!

नाचणी

पोषणमूल्ये - प्रथिने - ७.३ टक्के, कर्बोदके - ७.२ टक्के, स्निग्ध पदार्थ - १.३ टक्के, खनिजे - २.७ टक्के. नाचणीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि ‘ब’ जीवनसत्त्व यांचे प्रमाण जास्त आहे. पोटॅशियम हा पेशीद्रव्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

तो पेशीनिर्मितीसाठी, पर्यायाने स्नायूनिर्मिती आणि त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ‘ब’ वर्गीय जीवनसत्त्वे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.

नाचणीयुक्त अन्नपदार्थांचा वापर लहान मुले आणि गरोदर स्त्रियांमध्ये खूपच फायदेशीर आहे. वाढत्या वयाच्या मुलामुलींना पोषणद्रव्यांची गरज जास्त असते. ही गरज नाचणीयुक्त आहाराने भरून काढता येते.

नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्याने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर वाढू देत नाहीत, त्यामुळे रक्तशर्करेवर नियंत्रण राहते.

मधुमेह पीडित तसेच लहान मुलांच्या आहारात बाजरीप्रमाणेच नाचणीचा समावेश करावा, म्हणजे अनेक पोषकतत्त्वे मिळू शकतात. बालके व आजारी व्यक्तींना नाचणीची पेज किंवा सत्त्व दिले जाते. सध्या बाजारात नाचणीचे अनेक मूल्यवर्धित पदार्थ मिळत आहेत.

नाचणी पचायला हलकी असते. उत्तम अग्निदीपन घडून येते. आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना नाचणी खायला देणे फायदेशीर आहे, यामुळे शरीराची झालेली हानी भरून निघते. नाचणीपासून तयार केलेले पदार्थ लहान मुलांसाठी शक्तिवर्धक आहेत.

jowar bhakri
Millet Food : हडप्पा संस्कृतीतील लोकही खात होते 'हे' अन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.