Kabini National Park : कबिनीची 'ती' वाघिण

Jungle safari : हे जग मानवी जगापेक्षा खूपच निराळे असते. एकदा पोट भरले, की कोणताही हिंस्र प्राणी उगाचच शिकार करत नाही. विनाकारण अन्नाचा साठा करणे वगैरे फारच कमी प्रमाणात आढळते
kabini national park
kabini national parkEsakal
Updated on

अनिता गोखले कुलकर्णी, बंगळूर

निळ्याशार पाण्याच्या त्या कॅनव्हासवर अचानक ‘ती’ अवतरली. त्या हिरव्यागार झुडपांमधून एखाद्या धूमकेतूसारखी उगवली आणि तीही आरोळ्या ठोकत. समोरून झाडाच्या गर्दीतून सूर्यकिरणांची एक तिरीप तिच्या डोळ्यांवर पडली. तिच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती. विलक्षण सुंदर दिसत होती ती. कुठल्याही शृंगाराशिवाय. तिच्या पूर्ण शरीरावर एक सोनेरी चमक होती. तिची ती डौलदार चाल बघताना नजरेचे पारणेच फिटले.

माझे आणि कबिनीचे नाते जवळजवळ वीस वर्षे जुने आहे. २००३मध्ये आमची बंगळूरला बदली झाली. आम्हा दोघांनाही वन्यजीवनाविषयी अतोनात प्रेम आहे. बंगळूरला आल्यावर आम्ही लगेच जवळच्या राष्ट्रीय उद्यानाविषयी माहिती काढायला लागलो. गूगल कितपत वापरले ते आठवत नाही, पण आमच्या काही मित्रांनी आम्हाला कबिनीविषयी माहिती दिली.

कर्नाटकामध्ये दसरा हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. मुलांना अगदी दिवाळीसारखी लांबलचक सुट्टी असते. लगेच चार दिवसांचे कबिनी जंगल लॉजचे बुकिंग केले. त्यावेळेस तिथे बाकी फार रिसॉर्ट्‌स नव्हती. मुलेपण खूप उत्साहात होती. वाघोबा बघायला जायचे ह्या कल्पनेने अगदी हुरळून गेली होती.

कबिनी ते बंगळूर अंतर २२० किलोमीटर आहे. आम्ही आमच्याच कारने जायचे ठरवले. साधारण पाच तासांचा प्रवास होता. आता तर म्हैसूरपर्यंत एक्सप्रेस हाय-वे सुरू झाल्याने साडेतीन तासांतच कबिनीला पोहोचता येते. महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यांतून येणार असाल, तर म्हैसूर अथवा बंगळूरपर्यंत ट्रेनने, विमानाने किंवा बसने येऊन पुढे टॅक्सी घेऊन कबिनीला पोहोचता येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.