उषा लोकरे
नैवेद्यात व शुभकार्यात करंजी मानाची असते. भरगच्च खमंग सारणाची खुसखुशीत करंजी बघूनच तोंडाला पाणी सुटते. करंजी उत्तरेत गुजिया, गुजरातेत घुगरा, गोव्याच्या किनारपट्टीवर नेवरी आणि कर्नाटकात कडबू नावाने ओळखली जाते. तर, सीकेपी खाज्याचे कानवले, सारस्वत साट्याची करंजी म्हणून करंजी एन्जॉय करतात. पाश्चात्त्य देशांत ओव्हनमध्ये ती ‘बेक’ होते, आणि ‘मोमो’ म्हणून वाफवूनही आवडीने खाल्ली जाते.
साहित्य
सारणासाठी ः तीन वाट्या खोवलेले ताजे खोबरे, ३ वाट्या साखर, अर्धी वाटी खवा (खमंग भाजून), १ टेबलस्पून खसखस भाजून पूड, अर्धा चमचा वेलदोडा पूड, चारोळी, बेदाणे व बदामाचे काप.
पारीसाठी ः दोन वाट्या बारीक रवा, ३ टेबलस्पून तुपाचे मोहन, चवीला मीठ, दूध, तळण्यासाठी रिफाइंड तेल/तूप.