अनुभव काळेतळ्याकाठी झेब्रे पाणी प्यायला आले होते आणि आम्हाला लांबून लेकमध्ये मोठे मोठे दगड वाटले, ते हिप्पो निघाले. राइड संपवून पुन्हा रस्त्याला लागलो आणि खिडकीतून डोकावलो, तर जिराफ चालताना दिसले. हे असे निसर्गाचे चमत्कार केनियामध्ये सहज पाहायला मिळतात. .केनियाविषयी डॉक्युमेंटरी पाहिल्यापासून तेथील मसाईमारा हे निसर्गनिर्मित महद्आश्चर्य पाहायला पाहिजे असं प्रकर्षानं वाटत होतं. मी, माझी पत्नी, आमची आठ वर्षांची मुलगी अमेरिकेहून आणि माझे सासू-सासरे भारतातून नैरोबीला भेटणार होतो. आमची फ्लाइट दोहाला उशिरा पोहोचली त्यामुळे पुढची नैरोबीची फ्लाइट वेळेत मिळणं शक्य नव्हतं. एअरवेजच्या या सौजन्यानं अजून एक देश बघता आला. सर्वत्र प्रचंड संपन्नता, स्वच्छता असल्यामुळे अमेरिकेत असल्याचाच भास होत होता. कतारमध्ये अनेक भारतीय, नेपाळी, श्रीलंकन असल्याने वातावरणही ‘घरगुती’ वाटलं. सर्वात लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे दोहाची पूर्णपणे मानवनिर्मित, भव्यदिव्य आणि नेत्रदीपक स्कायलाईन. ते सौंदर्य रात्री अजूनच खुलून दिसतं! ते सौंदर्य डोळ्यात साठवून नैरोबीकडे मार्गस्थ झालो; पूर्वनियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिरा पोहोचलो. पहिला दिवस होता ‘ओल पजेटा’साठी. नैरोबीहून हा तीन तासांचा प्रवास अतिशय निसर्गरम्य परिसरातून आहे. सुदैवानं हवामान अतिशय आल्हाददायक असल्यानं आणि प्रदूषण अगदी कमी असल्यानं कुठलाच प्रवास त्रासदायक झाला नाही. आमचा गाइड मायकल बरीच वर्षं या व्यवसायात आहे. त्याच्या गाठीशी अनुभव असल्यामुळे आम्ही सगळीकडे वेळच्यावेळी पोहोचलो. केनिया पूर्वी ब्रिटिशांची कॉलनी होती, त्यामुळे छोट्या गावांमधल्या लोकांचंही इंग्लिश उत्तम आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जातं. मी सहज मायकलला,‘ तुला चहा आवडतो की कॉफी?’ असं विचारलं, तेव्हा कळलं की सामान्य केनियन नागरिकाला कॉफी परवडतच नाही कारण ती सगळी निर्यात होते. .एखादे स्थळ बघायला जाताना कधी-कधी वाटेत थांबत होतो. वाटेतल्या सगळ्या वॉशरूम अत्यंत स्वच्छ होत्या. केनियासाठी पर्यटन हेच महत्त्वाचं आर्थिक साधन असल्यानं स्वच्छतेची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. समोर गिफ्ट शॉप आणि मागे वॉशरूम अशी साधारण रचना असते. सगळीकडे विक्रेत्यांनी सांगितलेल्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीपर्यंत खाली येण्याची त्यांची तयारी दिसली. आम्ही अशा गिफ्ट शॉपमधून अनेक सुंदर चित्रं आणि कारागिरी असलेल्या छोट्या गोष्टी आठवण म्हणून घेतल्या. या दुकानांमध्ये किंवा इतरत्र सगळीकडेच केनियन लोकांचा अतिशय नम्र स्वभाव उठून दिसला. आम्ही रोज सकाळी चार-पाच तास प्रवास करत असू. त्यावेळी हमखास दिसणारी गोष्ट म्हणजे शाळेत निघालेल्या लहान मुली. रस्त्यावरच्या सगळ्याच खेड्यांमध्ये एखादीतरी शाळा बघून बरं वाटलं. शाळेत जाण्यासाठी लांब चालत जावं लागतं, हे माझ्या आठ वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच बघितलं, ते तिच्या चांगलंच लक्षात राहिलंय. असो!वर म्हटल्याप्रमाणे पहिला दिवस ‘ओल पजेटा’चा होता. ‘ओल पजेटा’ म्हणजे केनियामधील ‘खासगी पार्क’! इथे सिंह, हत्ती, जिराफ, झेब्रे, गेंडे, चित्ते आणि बिबट्यांचा वावर आहे. गेंड्यांचं संवर्धन इथं होतं. दोन पांढरे गेंडेही इथं आहेत. जीपमधून फिरताना सुरुवातीलाच मोठ्ठा हत्तींचा कळप दिसला. त्यांना मुक्त संचार करताना अगदी जवळून बघणं, हा अनुभव आयुष्यभर विसरणं विसरण शक्य नाही. तिथली जैवविविधता बघितल्यावर आम्ही परतीच्या वाटेला निघालो. अचानक मायकलनं वॉकीटॉकीवर जोरजोरात बोलायला सुरुवात केली आणि सुसाट गाडी सोडली. थोड्या वेळानं रस्ता सोडून चक्क गवतात गाडी घुसवली आणि बघतो तर काय, चक्क चार-पाच सिंह आणि त्यांचे छावे शिकार खात होते. हे आमचं पहिलं सिंह दर्शन! आम्ही हे दृश्य डोळ्यात साठवतोय तोच अजून एक सिंहीण शांतपणे गाडीच्या शेजारून चालत गेली आणि शिकारीचा एक भाग स्वतःसाठी घेऊन खात बसली. हे सगळं इतक्या जवळून बघणं म्हणजे केवळ पर्वणी होती. हे जंगली प्राणी पर्यटक किंवा सफारी जिपवर हल्ला करत नाहीत का? त्यांच्या जवळ जाणं कितपत सुरक्षित आहे? असे प्रश्न आम्हालाही पडले होते. ‘‘अनेक वर्षं या गाड्या प्राण्यांच्या जवळून जात असल्यानं, तो त्यांच्या इकोसिस्टीमचाच भाग झाला आहे. शिवाय प्राण्यांची दृष्टी आपल्यापेक्षा अधू असल्यानं त्यांना गाडीमध्ये माणसं आहेत हे न जाणवता गाडी हाच एक मोठा निरुपद्रवी प्राणी आहे असं वाटतं. हा प्राणी त्यांच्यावर हल्ला करत नाही किंवा त्यांना पाहून पळूनही जात नाही. त्यामुळे आपण परस्परांचं भक्ष्य होणार नाही ह्याची त्यांच्या मेंदूत कुठेतरी नोंद झालेली असते.’’- इति मायकल. हे खरं असलं, तरी पार्क रेंजर नेहमीच सतर्क असतात, असंही त्यानं सांगितलं. .सफारीच्या दुसऱ्या दिवशीचं आकर्षण म्हणजे फ्लेमिंगोंसाठी प्रसिद्ध असलेलं ‘लेक नाकुरू’. इथलं अन्य वन्यजीवनही थक्क करून सोडणारं आहे. हत्ती, जिराफ, झेब्रे या नेहमीच्या मित्रांशिवाय इथं आम्हाला अनेक प्रकारची माकडं, कोंबड्यासारखे दिसणारे छोटे प्राणी आणि मुख्य म्हणजे जंगली कुत्रे, हाईना आणि त्यांचं शिकारभक्षण बघायला मिळालं.नाकुरूच्या वाटेवर आम्ही विषुववृत्त ओलांडलं. या जागी आम्हाला ‘कोरीओलीस परिणाम’ हा एक शास्त्रीय प्रयोग बघायला मिळाला. एखाद्या भांड्यात पाणी घेतलं आणि त्यात छोटी काडी टाकली तर ती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनं फिरतं आणि दक्षिण गोलार्धात उलट्या दिशेनं फिरतं. हा बदल विषुववृत्त सोडून काही फूट दोन्ही दिशांना गेलं की प्रकर्षानं दिसतो.दोन दिवस वैविध्यपूर्ण जीवन बघितल्यानंतर ‘मसाईमारा’ या ग्रँड अॅट्रॅक्शनबद्दल आमची उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही शिगेल्या पोहोचल्या. मसाईमारा आणि शेजारच्या टांझानियामधील सेरेंगेटी हा ग्रासलँड पार्क बिग फाइव्ह म्हणजे बिबट, हत्ती, गेंडा, सिंह आणि आफ्रिकन म्हशी यांचं निवासस्थान! शिवाय टांझानियामधून केनियामध्ये होणारं मायग्रेशन आणि त्यांच्यावर हल्ला करायला टपून बसलेले सिंह हे दिसण्याचं खात्रीलायक ठिकाण. मसाईमारा पार्कच्या आतच अनेक रिसॉर्ट आहेत. सुरक्षेसाठी काहींच्या भोवती कुंपण आहे, तर काहींच्या भोवती खंदक.मसाईमाराच्या वाटेवर आम्ही एका तळ्यामध्ये बोट राइड केली. इथं तळ्याकाठी झेब्रे पाणी प्यायला आले होते आणि आम्हाला लांबून पाण्यात मोठे मोठे दगड आहेत असे वाटले ते हिप्पो निघाले. राइड संपवून पुन्हा रस्त्याला लागलो आणि खिडकीतून डोकावलो, तर जिराफ चालताना दिसले. हे असे निसर्गाचे चमत्कार केनियामध्ये सहज पाहायला मिळतात. मसाई लोकांविषयी मायकलला विचारल्यावर असं जाणवलं, की केनियन लोकांचं मसाई ट्राईबविषयी काही विशेष बरं मत नाही. ‘मसाई लोक शिकत नाहीत, आम्हाला त्रास देतात’, अशा सुरात बरीच गाऱ्हाणी मायकलनं मांडली. मसाईंना काही विशेष हक्क दिलेले आहेत. त्यांच्या जमिनी राखीव आहेत आणि ते अजूनही प्रगत मानवापासून अनेक कोस अंतर ठेवून आहेत वगैरे. नैरोबी ते मसाईमारा अंतर बरंच आहे. हवा छान असल्याने सगळ्यांनाच डुलकी लागली. अचानक आरडाओरड्याचे आवाज आल्यानं गाडी थांबली. बऱ्याच गाड्या रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. एक मसाई बाई रडत होती आणि बराच गलका जाणवला. मायकल गाडीतून उतरला आणि आल्यावर त्यानं सांगितलं, ‘‘एक मसाई मूल अचानक रस्ता ओलांडू लागलं त्यामुळे गाडीला ब्रेक मारायला लागला. मुलाला काही झालं नाही, पण असं काही झालं, की हे लोक ड्रायव्हरला मारतात आणि गाडीतल्या पर्यटकांच्या वस्तू चोरून नेतात. म्हणून अशावेळी आम्ही नेहमी थांबतो आणि पोलिस आल्यावरच पुढे निघतो.’’ थोड्याच वेळात पोलिस पोहोचले आणि आम्ही पुढे निघालो. .नवा दिवस, नवं जंगल! दुसऱ्या दिवशी सफारी सुरू झाली आणि काही वेळातच मसाईमारा काय चीज आहे हे बघायला मिळालं. दोन चित्ते अगदी चित्रात दिसतात त्याप्रमाणे एका उंचवट्यावर बसून शिकारीसाठी टेहळणी करत होते. पाठोपाठ सिंहांचा कळप निवांत बसलेला दिसला. त्यांनी नुकतीच एका झेब्र्याची शिकार केली होती. तो पोट फाडलेला झेब्रा आणि शेजारी सिंह हे दृश्य मनावर कायमचं कोरलं गेलं. इथं एक गोष्ट सांगायला पाहिजे, झूमध्ये प्राण्यांच्याजवळ जो एक कुबट वास असतो, तसा जंगलात चुकूनही येत नाही. जंगली कुत्री, गिधाडं आपापलं काम चोख बजावत असल्यानं हवा नेहमीच स्वच्छ आणि प्रसन्न असते. पुढे गेलो तर एक बिबट्या नुकतीच शिकार करून स्वस्थ पहुडला होता. बिबट्या आधी शिकार झाडावर नेऊन ठेवतो, त्यामुळे काही वेळानं तो ती शिकार घेऊन जवळच्या कुठल्यातरी झाडावर जाणार हे नक्की होतं. हे कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करायला नॅशनल जिओग्राफिकचे दोन-तीन ग्रुप जय्यत तयारी करून बसले होते. पुढे गेल्यावर एका विस्तीर्ण गवताळ जागी विसावलेला बिबट्या आणि जवळच लपलेलं डुक्कर दिसलं. ‘लाइव्ह शिकार’ बघायला मिळणार म्हणून गाड्यांमधल्या पर्यटकांनी श्वास रोखून धरले होते. थोड्याच वेळानं डुक्कर उठलं, त्याने चित्रविचित्र आवाज काढले. पाठोपाठ बिबट्या उठला. पण अहो आश्चर्यम्! बिबट्याला भूकच लागली नव्हती, त्यामुळे तो आणि डुक्कर जणू काही दोस्त असावेत अशा पद्धतीने रमतगमत एकत्र चालू लागले आणि आमच्या गाडीच्या अगदी समोरून दुसऱ्या झुडपात निघून गेले. ही ‘न झालेली शिकार’ खरंच अविस्मरणीय! .हजारोंनी सापडणाऱ्या मानवी अवशेषांमुळे हे सरोवर जागतिक स्तरावर एक गूढ सरोवर बनले आहे; जाणून घ्या या सरोवराचे रहस्य .आता सफारीचा शेवटचा दिवस! नैरोबीला परत जाण्याची वेळ येऊन ठेपली. मसाईमारामधली एअरस्ट्रीप म्हणजे अक्षरशः पन्नास फूट बाय पन्नास फूट मोकळी जागा. विमान येईपर्यंतचा मधला वेळ तिथल्या मसाई बहीण-भावांशी गप्पा मारण्यात छान व्यतीत झाला. भावाचं नाव नेमोडा आणि बहीण केमोडा. त्यांच्याकडून मी एक ट्रे विकत घेतला. त्यावर मसाई लोक एका सिंहाला भाल्याने मारत आहेत असं चित्र होतं. त्याविषयी बोलताना नेमोडा म्हणाला, ‘‘आम्ही नेहमी जंगली प्राण्यांबरोबर राहतो. आमच्यात एक प्रथा आहे. प्राण्यांची भीती जावी म्हणून मुलं अठरा वर्षांची झाली, की अशी दहा-पंधरा मुलं जंगलात जातात आणि भाल्यानं एक सिंह ठार करून त्याला घरी घेऊन येतात. जो मुलगा पहिल्यांदा भाला फेकतो त्याला सिंहाची आयाळ मिळते. मग ती आयाळ वापरून त्याचा मुकुट तयार करतात आणि देव असल्यासारखी मुकुटाची पूजा करतात.’’ असं सांगत असताना त्यानं त्याचा स्मार्टफोन काढला आणि त्यांनी केलेल्या शिकारीचे आणि त्याच्या आयाळयुक्त मुकुटाचे मला फोटो आणि व्हिडिओ दाखवले.नैरोबीला परतल्यावर परतीच्या विमानाच्या आधी बराच वेळ होता. दुपारच्या जेवणाची आमची सोय गुजराती रेस्टॉरंटमध्ये केली होती. नैरोबीचा हा भाग पूर्णपणे भारतीय झालेला दिसला. अमेरिकेमध्ये एडिसनमध्ये फिरताना असा अनुभव घेतला होता. परंतु घरांना भारतीय नावं मात्र कधी दिसली नव्हती. वाटेत ‘महाराष्ट्र मंडळ’ अशी मोठी पाटी बघून छान वाटलं. येथील गाइड आणि कर्मचारी, परदेशी नागरिकांना आगमनापासून, सफारीमध्ये आणि शेवटी एअरपोर्टवर सुखरूपपणे पोहोचवणं ही त्यांची जबाबदारी मानतात आणि ती चोखपणे निभावतात.केनियाला पुन्हा जाणार का? असं मला कोणी विचारलं, तर माझं उत्तर असेल, ‘‘हो! नक्की. मी एका पायावर तयार आहे. तुम्ही कधी निघताय?’’----------------------.ट्रक, ट्रॅक्टर, मोठ्या ट्रॉल्या आणि अगदी बुलडोझर चालवणारी ही आजी कोण? त्यांना याबाबत मिळाला भारतातील पहिली महिला होण्याचा मान .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.