अजित मुठेकेरळमध्ये कुठेही नॉनव्हेज खाणाऱ्यांचे जेवणाचे हाल होत नाहीत. मटण, चिकन व माशांचे विविध प्रकार येथे मिळतात. शाकाहारी जेवणाऱ्यांना सांबर-भात, पनीर आणि त्यांच्या भाषेतील मैद्याच्या पोळ्या हेच खावे लागते. .सन २०१६पासून सुरू झालेला बाइक टूरचा सिलसिला आज केरळ-कन्याकुमारीपर्यंत येऊन पोहोचला. केरळ-कन्याकुमारी बाइक टूर पूर्ण झाली आणि देशातील व परदेशातील मिळून दहा बुलेट टूर पूर्ण झाल्या.लडाखला बुलेटवर जायचे म्हणून २०१६मध्ये मी बुलेट घेतली. नंतर अलिबाग, गोवा, भूतान, नेपाळ, धनुष्यकोडी, लडाख, कोस्टल कर्नाटक, दमण, हंपी इत्यादी बुलेट टूर केल्या. मात्र अजून केरळ बाकी होते. केरळला बुलेटवर जायचेच, हे तीनेक वर्षांपूर्वी धनुष्यकोडीची बाइक टूर केली होती तेव्हाच नक्की केले होते. मात्र मधेच आलेल्या कोरोनामुळे ही टूर पुढे ढकलावी लागली. मात्र आता काहीही झाले तरी केरळचा प्लॅन अमलात आणायचे नक्की केले होते. शाळेच्या दहावीच्या ग्रुपला विचारले, तर प्रत्येकाने नेहमीप्रमाणे वेगवेगळी कारणे सांगितली. फक्त बंड्या आणि त्याची पत्नी येतो म्हणाले. त्यांची ही पहिलीच बाइक टूर होती.कोचीनला पोहोचल्यावर एक दिवस आराम केला. दुसऱ्या दिवशी अलेप्पीमार्गे त्रिवेंद्रमला जाण्यासाठी निघालो. हे अलेप्पी म्हणजेच अलप्पुझा. येथील बॅकवॉटर राइड प्रसिद्ध आहे. अलेप्पीलाच पूर्वेकडील व्हेनिस म्हटले जाते. मात्र इटलीच्या व्हेनिसपेक्षा आपले अलेप्पी शंभरपटीने चांगले आहे. व्हेनिसला पाण्याचा अक्षरशः घाणेरडा वास येतो. मात्र आपल्याकडे जे परदेशातील असेल, त्यालाच चांगले म्हणायची सवय आहे. असो! .त्रिवेंद्रमला जाताना मधेच बंड्याच्या बाइकच्या इंजिनला काहीतरी प्रॉब्लेम आला, आणि ते दुरुस्त होण्यात एक-दीड तास गेला. त्रिवेंद्रमला पोहोचल्यावर सकाळी श्रीपद्मनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी गेलो. पूर्वी मंदिरांमध्ये इतकी गर्दी नसायची, आता प्रत्येक दिवशी प्रचंड गर्दी असते. केरळमधील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ड्रेस कोड पाळला जातो. पुरुषांनी धोतर किंवा लुंगी नेसायची व वरती एक उपरणे घ्यायचे आणि महिलांना साडीच नेसावी लागते. जर पंजाबी ड्रेस असेल, तर वरून पांढरा कपडा बांधावा लागतो. जीन्स पँट वगैरेचा तर विचारही करू नये. त्याचप्रमाणे केरळच्या मंदिरांत ज्याठिकाणी देवाची मूर्ती असते, तेथे केवळ निरांजन, समयाच लावलेल्या असतात. ही मंदिरे भल्या सकाळी तीन-चार वाजता उघडतात आणि रात्री नऊ-साडेनऊपर्यंत बंद होतात.वीस वर्षांपूर्वी भेट दिलेले केरळ आता कमालीचे बदलले आहे. मोठमोठे रस्ते, मॉल, चकचकीतपणा या सर्व गोष्टी इथेही आल्या आहेत. येथील ऐंशी टक्के लोक आखाती देशांत नोकरी करत असल्याने आलेली सुबत्ता जागोजागी दिसून येते. खेडेगावातही प्रचंड मोठमोठे बंगले दिसून येतात. मात्र हे बंगले एकतर रिकामे आहेत किंवा तेथे वयस्कर व्यक्तीच राहतात.श्रीपद्मनाभस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर कन्याकुमारीकडे निघालो. त्रिवेंद्रम ते कन्याकुमारी हे अंतर ९०-९५ किलोमीटर आहे. त्यामुळे संध्याकाळी कन्याकुमारीला पोहोचलो. कन्याकुमारीला अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालचा उपसागर हे तिन्ही समुद्र एकत्र येतात. मात्र याचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिन्ही समुद्राच्या पाण्याचा रंग वेगवेगळा आहे आणि ते तिथे स्पष्ट दिसते. .कन्याकुमारीला बरोबर वीस वर्षांपूर्वी भेट दिली होती. स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाजवळच तमीळ कवी तिरुवल्लुवर यांचा मोठा पुतळा समुद्रात उभारण्यात आला आहे. आपल्याकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीतून वर आल्या होत्या, अशी कथा सांगितली जाते, त्याचप्रमाणे तिरुवल्लुवर यांच्या पोथ्यासुद्धा पाण्यातून वर आल्या होत्या, असे म्हटले जाते. कन्याकुमारी येथे समुद्र किनारीच कन्याकुमारी देवीचे मंदिर आहे. पूर्वी स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट द्यायची असेल तर छोट्या होड्या होत्या. आता त्या जागी छोट्या बोटी आल्या आहेत. तिरुवल्लुवर स्मारकाचे काम सुरू असल्याने तेथे जाता आले नाही.कन्याकुमारीहून कुमारकोम येथे जाण्यासाठी निघालो. जवळजवळ २६० ते २७० किलोमीटर अंतर होते म्हणून सकाळी लवकर निघालो. सुचिंद्रम- नागरकॉईल (हे कन्याकुमारीजवळ असणारे रेल्वे स्टेशन आहे व भारतातल्या सर्व ठिकाणांहून येथे थेट रेल्वे आहेत)- त्रिवेंद्रम- कोट्टायम या मार्गे कुमारकोमला जाण्यासाठी निघालो. रस्त्यात चडयमंगलम येथे जटायू अर्थ सेंटर आहे. रावणाशी युद्ध करताना जटायू इथेच जखमी झाला होता, अशी कथा आहे. येथे टेकडीवर मोठे स्मारक बांधले आहे.बंड्या कोट्टायमऐवजी अलेप्पीमार्गे निघाला. कुमारकोमला केरळमध्ये कुमारगाम असे म्हणतात. कुमारकोम हे अतिशय शांत असे बॅकवॉटरच्या काठावर असलेले छोटेसे गाव आहे. येथील शांतता हेच याचे वैशिष्ट्य आहे. कदाचित त्यामुळेच येथे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. कुमारकोमला बॅकवॉटर राइडचा आनंद घेतला. दाक्षिणात्य हॉटेलांमध्ये जेवणाचे हाल होत होते. अखेर कुमारकोमच्या हॉटेलमध्ये मिरचीचा ठेचा करायला लावला आणि तो खाल्ल्यावर काहीतरी आपले जेवल्यासारखे वाटले. आता उद्या मुन्नारला जायचे होते. .मुन्नार...! निलगिरी पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण! हिरवेगार चहाचे मळे, विविध मसाले मिळण्याचे! येथून जवळच अन्नामुडी हे निलगिरी पर्वतरांगेतील दक्षिण भारतातील उंच शिखर आहे. येथे पूर्वी टाटांच्या चहा मळ्यांकरिता वाहतुकीची सुविधा व्हावी म्हणून टाटांनी येथे उंचावर रेल्वे स्टेशन बांधले आहे. त्याला ‘टॉप स्टेशन’ असे म्हणतात. सध्या हे स्टेशन बंद आहे.मुन्नारच्या चहाच्या बागांमध्ये आजपर्यंत अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. येथे मुथुपट्टी डॅम आहे. विविध शूटिंग स्पॉट आहेत. या सर्वांबरोबर महत्त्वाचे म्हणजे येथील निसर्गसौंदर्य अलौकिक आहे. ढगांची झुल पांघरलेले डोंगर, अचानक येणारा पाऊस; पंख्याची आवश्यकता वाटू नये असे थंडगारवातावरणात येथे आहे. मात्र आपल्या वर्तनातून आपण या निसर्गाचा नाश करत आहोत, हे सर्वच ठिकाणच्या हिल स्टेशनवर जाणवायला लागले आहे. १०-१५ वर्षांपूर्वी जसे वातावरण हिल स्टेशनला होते, तसे आता राहिलेले नाही हे तिथे जाताच जाणवते. सर्वत्र प्लॅस्टिकचा कचरा, काँक्रिटीकरण, स्वच्छता, पर्यावरण, स्थानिक संस्कृती या बाबींशी फारसा संबंध नसणारे व्यावसायिक. फक्त पैसा कमविणे हाच एकमेव उद्देश असतो. यामुळे निसर्गाची झालेली धुळधाण पाहता चीड येते. मुन्नार, मनाली, डलहौसी, उटी, कोडाई कॅनॉल, खज्जियार, रोहतांग, ऋषिकेश, मसुरी, दार्जिलिंग, महाबळेश्वर, माथेरान इत्यादी याची चांगली उदाहरणे आहेत. मुद्दा असा, की २० वर्षांपूर्वी पाहिलेले मुन्नार आणि आजचे मुन्नार यात जमीन-अस्मानाचा फरक होता. असेच सुरू राहिले तर काही वर्षांनी आपल्याला हिल स्टेशनवर जायचे म्हणजे फक्त परदेशात जावे लागेल. .आता गुरुवायूरला जायचे होते. गुरुवायूर या ठिकाणी श्रीकृष्णाचे मंदिर आहे. गुरू आणि वायू यांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. गुरुवायूरला कृष्णाला विविध वेळी भोग (नैवेद्य) दाखविला जातो आणि त्यावेळी दर्शन थांबविले जाते. येथील मंदिरात रोज रात्री हत्तीवरून कृष्णाची मिरवणूक काढली जाते. त्याचप्रमाणे रात्री संपूर्ण मंदिरावर पणत्या लावल्या जातात. पणत्यांच्या उजेडात मंदिर सुरेख उजळून निघते. गुरुवायूरला येताना रस्त्यात थ्रिसूर लागले. येथे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. शंकराला येथे ‘श्रीवडक्कूनाथन स्वामी’ म्हणतात. दक्षिण भारतातील बहुसंख्य मंदिरात त्याच्या स्वतःच्या मालकीचे हत्ती आहेत.केरळमध्ये कुठेही नॉनव्हेज खाणाऱ्यांचे जेवणाचे हाल होत नाहीत. मटण, चिकन व माशांचे विविध प्रकार येथे मिळतात. शाकाहारी जेवणाऱ्यांना सांबर-भात, पनीर आणि त्यांच्या भाषेतील मैद्याच्या पोळ्या हेच खावे लागते. केरळचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे शंभर टक्के टक्के साक्षरता आहे. त्यामुळे कदाचित तेथे शिस्त, वाहतुकीचे नियम शंभर टक्के पाळले जातात. हायवेलासुद्धा लाल सिग्नल असले, तर टू व्हिलरसह सर्व वाहने सिग्नल हिरवा होईपर्यंत थांबतात. नाहीतर आमच्या नाशिकमध्ये सह्याद्री हॉस्पिटल, द्वारका, गंजमाळ या ठिकाणी सिग्नलला थांबायचे असते हेच कोणाला माहीत नाही, असो....!तर अशारितीने नेहासोबत कोचीन, अलेप्पी, कोल्लम, त्रिवेंद्रम, सुचिंद्रम, कन्याकुमारी, कोट्टायम, कुमारकोम, मुन्नार, गुरुवायूर अशी केरळ टूर पूर्ण केली. आता गुजरात, राजस्थान व नॉर्थ-ईस्ट बुलेट टूर पूर्ण करायची आहे...!-------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.