डॉ. अनिल लचके
स्वयंप्रकाशी नसूनही चंद्र अंधारात आपले अस्तित्व दर्शवतो. चंद्राच्या विविध ‘कला’ ललित आणि वैज्ञानिक साहित्यात मोलाची भर घालतात. पुनवेची रात्र काही तासांचीच असते, पण ‘घन तिमिरी’ चंद्राचे शुभ्र किरण आसमंतात विखरून गेलेले पाहताना भान हरपते.
आश्विन पौर्णिमेच्या रात्री...
शरद पौर्णिमा आली...
कोजागरीच्या चांदण्या रात्री
चांदणे शरदाचे!
२९४ चंद्रांच्या प्रांगणात
चांदण्यांमधील उदंड चंद्र...
आश्विन-कार्तिक महिन्यातील आकाश बहुतांशी निरभ्र असते. सर्वत्र हिरवीगार झाडे आणि फुललेली फुले दिसतात. संध्याकाळनंतर शीतल झालेल्या वातावरणाची सुखद अनुभूती येते. मन प्रसन्न करणाऱ्या शरद ऋतूची ही चाहूल असते.
सुगीच्या दिवसात येणाऱ्या नवरात्र, कोजागरी पौर्णिमा आणि दिवाळी या सणांची आबालवृद्ध प्रतीक्षा करत असतात. मनातील मळभ दूर करायला यथायोग्य अशा आश्विन पौर्णिमेच्या मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि ‘को जागर्ति’ (कोण जागृत आहे?) असं विचारते.
जो जागृत राहून आपल्या शरीराची, मनाची आणि परिसराची स्वच्छता ठेवतो, त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याला आरोग्य व धनसंपदा प्राप्त करून देते, अशी समजूत आहे. ‘को जागर्ति’वरून कोजागरी शब्द तयार झाला. (‘कोजागिरी’ हा शब्द बरोबर नाही.)