ओंकार धर्माधिकारी
राजर्षी शाहू महाराजांच्या आश्रयाने करवीर संस्थानात विविध कलाप्रकार रुजले. उत्तरेतील ख्याल गायकीची परंपरा इथे सुरू झाली. चित्रकलेचे ‘कोल्हापूर स्कूल' नावारूपाला आले. मराठी चित्रपटाची तर ही पंढरीच. इथे कलाप्रकारांबरोबरच कलासक्तही विकसित झाले. काळाच्या ओघात आलेल्या आव्हानांना तोंड देत त्यांनीच ही कलापरंपरा जोपासली आहे.