पावसाळ्यात आजूबाजूच्या खोल दऱ्यांत उतरणारे ढग, क्षणात निरभ्र होणारे आकाश व कड्यावरून कोसळत असलेले शुभ्र फेसाळणारे छोटे छोटे धबधबे, गार वारे, अधूनमधून कोसळणारा पाऊस मनाला मोहून टाकत असतो. गर्द झाडी असल्याने हे थंड हवेचे ठिकाण असल्यासारखे भासते. रानफुले व रानभाज्यांचाही हंगाम याच काळात असतो.