उदय गायकवाड
बदलणाऱ्या जगाला एका वैभवशाली वारशाचं दर्शन घडविणाऱ्या अनेक वास्तू कोल्हापूरच्या आगळेपणात भर घालणाऱ्या आहेत.
उत्तम निसर्गसंपदा, डोंगर-दऱ्या, गुहा, गडकिल्ले, मंदिरे, राजवाडे, नदी किनाऱ्यांवरचे घाट आणि विविध शैलींमध्ये बांधलेल्या अनेक वास्तूंची वैभवशाली संपन्नता व इतिहास कोल्हापूरला लाभला आहे.
इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकातील पोहाळे आणि मसाई पठारावरील बौद्ध परंपरेतील गुहा, रामलिंग परिसरातील जैन गुहा यांमध्ये फारसे कलाकुसरीचे काम दिसत नसले, तरी परंपरा दर्शविणाऱ्या वास्तू म्हणून त्यांकडे पाहावे लागेल.