साधना तिप्पनाकजे, ठाणे
दमट हवामानामुळे एकंदरच कोकणी स्वयंपाक तसा सौम्य चवीचा; तिखट-जाळ व तेलाचा तवंग नसणारा. तांदूळ आणि नारळ हे इथलं स्टेपल फूड. नारळाचा पुरेपूर वापर इथल्या प्रत्येक पदार्थात असतोच. कोकणातील सोलकढीच्या प्रेमात तर बरेचजण आहेत. इथलं नारळाचं सार कधी चाखलं आहे? हे सार भातावरही घेता येतं. पाऊस आणि थंडीत तर कुळथाचं कळण तर होतंच, पण बाकीची कळणं आता जरा मागे पडली आहेत..