लडाखमध्ये रात्रीचं आकाश रंगीबेरंगी; इंडियन अॅस्ट्रॉनॉमिक ऑब्झर्वेटरीनं याचं निरीक्षण

‘परफेक्ट’ वातावरणामुळं लडाखमध्ये रात्रीचं आकाश रंगीबेरंगी प्रकाश-पट्ट्यांनी उजळून निघालं!
Colorful light-stripes
Colorful light-stripesesakal
Updated on

इरावती बारसोडे

अगदी दोन-तीनच महिन्यांपूर्वीची गोष्ट... काही सौरवारे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकले. त्यात काही नवीन नाही, तसे ते अधूनमधून धडकत असतात. पण हे जिओमॅग्नेटिक वादळ आलं तेव्हा सगळं कसं छान जुळून आलं... म्हणजे आकाश स्वच्छ होतं, ढगांचा कुठंच मागमूस नव्हता आणि मिट्ट काळोख होता...

याच ‘परफेक्ट’ वातावरणामुळं लडाखमध्ये रात्रीचं आकाश रंगीबेरंगी प्रकाश-पट्ट्यांनी उजळून निघालं! हे प्रकाशाचे पट्टे म्हणजे ध्रुवीय प्रदेशात अधूनमधून दिसणारे अरोरा! माउंट सरस्वतीवर असलेल्या इंडियन अॅस्ट्रॉनॉमिक ऑब्झर्वेटरीनं याचं निरीक्षणही नोंदवून ठेवलं आहे. आणि अर्थातच कॅमेऱ्यातही हे प्रकाश-पट्टे कैद करून ठेवले आहेत.

दोन-तीन महिन्यांपूर्वी लडाखमध्ये दिसलेले प्रकाश-पट्टे आत्ता आठवण्याचं कारण काय? तर, अरोरासंबंधी एक बातमी नुकतीच वाचनात आली. कार्बन डायऑक्साईड वायूशी जोडले गेलेले किंवा वायूच्या अणूंपासून तयार झालेले अरोरा आढळले आहेत. पण याची बातमी व्हावी असं यात काय वेगळं होतं?

जरा खोलात जाऊन वाचलं, तर कार्बन डायऑक्साईडबरोबर जोडले गेलेले अरोरा पृथ्वीवर पहिल्यांदाच आढळले आहेत, असं बातम्यांमध्ये म्हटलेलं होतं. आणि आतापर्यंत जे अरोरा दिसत होते, ते नेहमीच फक्त ऑक्सिजन आणि नायट्रोजन या वायूंशी जोडलेले होते, असं विज्ञान सांगतं.

Colorful light-stripes
Sakal Training : उद्यापासून मशरूम शेती व व्यवसायाबाबत प्रशिक्षण

थंड प्रदेशात, रात्रीच्या आकाशात हलणारे डुलणारे लाल, निळे, पिवळे, हिरवे, केशरी रंगांचे हे अरोरा नामक पट्टे म्हणजे निसर्गाचा एक देखणा आविष्कार! अरोरा तयार होण्याची क्रियाच मुळी सूर्यापासून सुरू होते. सूर्यावरून बाहेर पडणारे सोलर विंड- सौरवारे, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येतात.

पृथ्वीच्या वातावरणातल्या ऑक्सिजन व नायट्रोजन, आणि आता कार्बन डायऑक्साईड वायूच्या अणूंना धडकतात. यातून जी ऊर्जा बाहेर पडते त्यातून रंगीबेरंगी प्रकाशाचे विलोभनीय पट्टे तयार होतात. हे प्रकाश-पट्टे ध्रुवीय प्रदेशांमध्ये दिसतात. असं का? तर तिथंच चुंबकीय क्षेत्र जास्त प्रभावी असतं.

Colorful light-stripes
SAKAL YIN Monsoon Session: ध्येय निश्चितीसाठी रोडमॅप आवश्यक : डॉ. रवींद्र सपकाळ

म्हणूनच त्यांना ‘नॉर्दन’ आणि ‘सदर्न लाइट’सुद्धा म्हणतात. उत्तरेकडे त्यांना ‘अरोरा बोरेलिस’ (Aurora Borealis) म्हणूनही ओळखलं जातं, तर दक्षिणेकडे ‘अरोरा ऑस्ट्रेलिस’ (Aurora Australis) म्हणून ओळखलं जातं.

प्राचीन ग्रीक आणि रोमन खगोलशास्त्रज्ञांनी अरोरा बोरेलिसचा अभ्यास केला होता. ग्रीक आणि रोमन संस्कृतीमधून ‘अरोरा बोरेलिस’ हे नाव उदयाला आलं. ‘अरोरा’ ही पहाटेची रोमन देवता (गॉडेस ऑफ डॉन), तर ‘बोरिअस’ हा उत्तरेच्या वाऱ्यांचा ग्रीक देव (गॉड ऑफ नॉर्थ विंड) मानला जातो.

कार्बन डायऑक्साईडशी संबंधित अरोरांची माहिती संशोधकांना अमेरिकेतील नासाच्या अॅक्वा सॅटेलाईटकडून मिळाली आहे. हा उपग्रह नासानं २००२मध्ये लाँच केला होता. २००२पासून गेली २० वर्षं सातत्यानं माहितीचं संकलन करून, त्या माहितीचं विश्लेषण करून मगच संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत,

की अरोरा तयार होण्याला वातावरणातील दोन नाही तर तीन वायू कारणीभूत आहेत. पण कार्बन डायऑक्साईडपासून तयार होणारे अरोरा अजूनही दुर्मीळ आहेत आणि कमी प्रमाणात आढळतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

Colorful light-stripes
Sakal Podcast : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ते भाजप आमदार कोर्टावरच चिडले

साधारणपणे अरोरा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ९७-१००० किलोमीटर वर आढळतात. मानवानं उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण एवढं वाढलंय का, की तो आता पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये जाऊन पोहोचला आहे? अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीज् स्कुल ऑफ अर्थ अॅण्ड स्पेस एक्सप्लोरेशन

येथे साहाय्यक प्राध्यापक असलेल्या कॅट्रिना बोसेर्ट यांच्या म्हणण्यानुसार, कार्बन डायऑक्साईडशी संबंधित असलेले अरोरा अवकाशाच्या कडेवर - ‘एज ऑफ स्पेस’वर आढळले आहेत. सामान्यतः उपग्रह ज्या कक्षेमध्ये परिभ्रमण करतात, त्याच्या थोडंसंच खाली हे अरोरा दिसले आहेत. आता कार्बन डायऑक्साईडच्या अणूंपासून तयार होणारे अरोरा आढळल्यामुळे अरोरांच्या अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()