निकिता कातकाडेदंतकथांचा अगदी सहज मागोवा घेतला तरी एकच घटना जगातले वेगवेगळे मानवसमूह वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना दिसतात. मोतीही याला अपवाद नाहीत. ह्या मौल्यवान रत्नाबद्दलदेखील जगात वेगवेगळ्या कथा, रंजक मिथके आहेत. .समुद्रकाठी वसलेल्या एका गावात समुद्रदेवतेच्या पूजेची प्रथा होती. त्यांच्या जगण्याचा आधार असणाऱ्या समुद्रदेवाच्या आशीर्वादाने गाव समृद्ध आणि सुखी आहेत, अशी गावकऱ्यांची पिढ्यानपिढ्यांची श्रद्धा होती. कधीकाळी समुद्रदेवाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन, आशीर्वाद म्हणून त्यांना एक अनमोल खजिना दिला. दैवी शक्तीने भरलेला रहस्यमय मोत्यांचा खजिना होता तो. गावकऱ्यांसाठी हा मोत्याचा खजिना म्हणजे गावाच्या भाग्याचे प्रतीक होते. या खजिन्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून गावकऱ्यांनी मोत्यांचा खजिना एका गुप्त ठिकाणी लपवला होता. आणि ते ठिकाण फक्त गावातील काही वृद्धांनाच माहिती होते, कारण समुद्रदेवाच्या आशीर्वादाने निवडलेल्या गावकऱ्यांनाच ठिकाण माहीत असेल, अशीच गावाची प्रथा होती. एकदा एका क्रूर आणि लोभी समुद्र-तस्कराचे जहाज त्या गावाच्या किनाऱ्याला लागले. या समुद्र-तस्कराने समुद्रदेवाच्या मोत्यांच्या खजिन्याबद्दल ऐकले होते, आणि काहीही करून मोत्यांचा तो खजिना त्याला हस्तगत करायचा होता. तस्कर आणि त्याच्या साथीदारांनी गावावर हल्ला केला. गावकऱ्यांनी समुद्रदेवाची करुणा भाकली. समुद्रदेवाने त्यांना खजिन्याच्या रक्षणाची एक युक्ती सांगितली. त्या युक्तीमुळे गावकऱ्यांनी चोरांना पळवून लावले, आणि मोत्यांचा खजिना त्या गुप्त ठिकाणीच सुरक्षित राहिला. समुद्रदेवाचे आशीर्वाद आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे खजिना सुरक्षित राहिला आणि गाव आधीप्रमाणेच सुखी राहिले.मोत्यांच्या खजिन्याची अशी एक कथा मी लहान असताना आज्जीकडून ऐकल्याचं आजही आठवतं. या कथा त्या वयात अगदी खऱ्या असतात. नंतर वास्तवाची जाणीव होत गेली तरी अशा दंतकथांचं मोल उणावत नसतं..पिढ्यांकडून पिढ्यांकडे जात राहणाऱ्या या दंतकथा जगभरातल्या सगळ्या मानवसमूहांच्या सांस्कृतिक संचिताचा भाग असतो, असं लोकसाहित्याचे अभ्यासक सांगतात. या दंतकथांचा अगदी सहज मागोवा घेतला तरी एकच घटना जगातले वेगवेगळे मानवसमूह वेगवेगळ्या पद्धतीने सांगताना दिसतात. जगाच्या निर्मितीच्याच कथा पाहा.जग कसं निर्माण झालं याची प्रत्येक संस्कृतीची आपलीआपली एक कथा आहे. मोतीही याला अपवाद नाहीत. ह्या मौल्यवान रत्नाबद्दलदेखील जगात वेगवेगळ्या कथा, रंजक मिथके आहेत. शतकानुशतके माणसाला मोत्यांनी मोहित केले आहे ते केवळ त्यांच्या सौंदर्यामुळेच नाही तर त्यांच्या भोवती गुंफलेल्या दंतकथांमुळेदेखील. आणि यातल्या बहुतेक कथा प्रेम, सौंदर्य देवता आणि पाण्याशी संबंधित आहेत.त्यातल्याच या काही कथा...देवांचे अश्रू : काही हिंदू पौराणिक कथांमध्ये मोती हे समुद्रकन्या देवी लक्ष्मीचे अश्रू असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या एका कथेनुसार, देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा स्वर्गातून मोती पडले. मानवतेच्या सुखासाठी हा वर्षाव झाला, असे मानले जाते.आणखी एका कथेनुसार मोती हे जगाला सौंदर्य देणारे चंद्राचे अश्रू मानले जातात. प्राचीन रोमन संस्कृतीमधील श्रद्धांनुसार मोती सौंदर्यदेवता व्हीनसशी संबंधित आहेत, कारण रोमन मिथककथांनुसार प्रेम आणि सौंदर्याची देवी असणाऱ्या व्हीनसचा जन्मही मोत्याप्रमाणेच समुद्रातून झाला होता.व्हीनसचाच ग्रीक अवतार असणाऱ्या ग्रीसियन ॲफ्रोडाईटीच्या अश्रूंमुळे मोती निर्माण झाले, अशी कथा ग्रीक संस्कृती सांगते..शुद्धतेचे प्रतीक : अनेक संस्कृतीमध्ये मोती शुद्धता निरागसता आणि नम्रतेचे प्रतीक मानले जाते, तर आशियायी संस्कृतींमध्ये मोत्यांमुळे नशीब चांगले होते आणि मोत्यांमुळे समृद्धी येते, असे मानले जाते.गुडलक चार्म : काही आशियायी संस्कृतींमध्ये मोत्यांमुळे नशीब उघडते आणि मोत्यांमुळे समृद्धी येते असे मानले जाते. मोती परिधान करणारी व्यक्ती नशीबवान ठरते, अशीही अनेकाची पारंपरिक श्रद्धा असते.प्रेमाचे प्रतीक : काही लोककथा मोत्यांचा संबंध प्रेम व विवाहाशी जोडतात. म्हणूनच अनेकदा विवाहप्रसंगी दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये मोती देण्याची प्रथा आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि अनोख्या वैशिष्ट्यांमुळे मोती प्रेमाचे प्रतीक मानले जातात.जलपरीचे चुंबन : काही युरोपियन कथांमध्ये मोती हे जलपरीचे चुंबन असल्याचे मानले जाते, आणि त्यामुळे मोत्यांमध्ये जादुई शक्ती असते, असे समजले जाते. जलपरीने शिंपल्याचे चुंबन घेतल्याने शिंपल्यात मोती निर्माण होतो, अशा अर्थाच्या परीकथा वाचायला मिळतात, तर काही स्कॉटिश आणि आयरिश कथांनुसार जलपऱ्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून माणसाला मिळालेली भेट म्हणजे मोती.समुद्र किंवा जलाशय हा कल्पनेतल्या जलपऱ्या आणि मोती यांच्यामधला समान धागा असल्याने या कथा रचल्या गेल्या असाव्यात, असे अभ्यासक सांगतात.दुष्टशक्तींपासून संरक्षण : काही चिनी कथा मोत्यांना ड्रॅगनशी जोडतात. जेव्हा ड्रॅगन लढतात तेव्हा मोती आकाशातून पडतात, आणि ते दुष्टशक्तींपासून माणसांचे संरक्षण करतात, असे मानले जाते.काही संस्कृतींमध्ये मोती ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे असे समजतात. उदासीनता, मानसिक विकार बरे करण्यास, स्मरणशक्ती सुधारण्यास आणि व्यक्तींची बुद्धिमत्ता वाढविण्यास मोत्यांची मदत होते, असेही समजले जाते.---------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.