डॉ. प्रीती जोशी
लिबरल आर्ट्समध्ये एक मुख्य विषय आणि त्याला पूरक असे इतर अनेक विषय, त्यातून कोणते विषय निवडायचे, याचे स्वातंत्र्य आणि मत विद्यार्थ्यांचे असते, हे लिबरल आर्ट्सचे अनन्यसाधारण वेगळेपण आहे.
लिबरल आर्ट्स विद्यार्थ्यांना एकाचवेळी अभ्यासविषयात व्यापक, विस्तारित आणि सखोल ज्ञान देतेच शिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगारक्षम कौशल्य विकासावरदेखील काम करते. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने लिबरल आर्ट्स ही विद्याशाखा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षणसंस्थांच्या दृष्टीने सर्वाधिक स्वीकारार्ह ठरते आहे.