डॉ. विवेक घोटाळे
सध्या दर पाच वर्षांनी देशात वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात. एक देश, एक निवडणूक या संकल्पनेचा पाठपुरावा म्हणून संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याविषयी अभ्यास करण्यासाठी, केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केल्याचे घोषित केले.