12 Jyotirlingas of Lord Shiva
ज्योतिर्लिंग म्हणजे व्यापक ब्रह्मात्मलिंग किंवा व्यापक प्रकाश असा अर्थ काही अभ्यासक सांगतात. तैत्तिरीय उपनिषदात ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या बारा तत्त्वांना ज्योतिर्लिंगे म्हटले आहे, तर काही अभ्यासक बारा ज्योतिर्लिंगे म्हणजे शिवलिंगाचे बारा खंड आहेत असे मानतात.