भरत ओसवाल
कोणतेही स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी लागते ते कुशल मनुष्यबळ, भांडवली गुंतवणूक, चांगल्या पायाभूत सुविधा आणि अनुकूल सरकारी धोरण.
महाराष्ट्रात शैक्षणिक, औद्योगिक, तांत्रिक, वित्तीय संपन्नता असल्याने स्टार्टअप्ससाठी पोषक इकोसिस्टीम तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांमधील तरुण स्टार्टअपकडे वळत असल्याचे दिसते.
स्टार्टअप्सची पाळेमुळे रुजली आहेत अशा भारतातील प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. स्टार्टअप इंडियामध्ये ३ सप्टेंबर २०२४पर्यंत देशभरातून ३२ लाख ८ हजार ६३४ स्टार्टअप्सची नोंदणी झाली होती.